‘ज्ञानेश्वर’च्या प्रवेशद्वारी भाजपाचे उपोषण

उसाला प्रतिटन 2800 रुपये भाव देण्याची मागणी
‘ज्ञानेश्वर’च्या प्रवेशद्वारी भाजपाचे उपोषण

भेंडा |वार्ताहर| Bhenda

कृषिमूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार(As per the recommendation of the Agricultural Prices Commission) ऊसाला प्रतिटन 2800 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे (Former MLA Balasaheb Murkute) यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी काल गुरुवारी भेंडा (Bhenda) येथे लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या (Marutrao Ghule Patil Dnyaneshwar Sahakari Sugar Factory) प्रवेशद्वारी एक दिवसाचे उपोषण केले.

यावेळी श्री.मुरकुटे म्हणाले, साखर कारखान्याने (sugar Factory) चालू गळितासाठी केंद्र सरकारच्या निर्णयानुसार 9decision of the government) 10 टक्के साखर उतारा असलेल्या उसाला हमीभाव म्हणून शेतकर्‍यांना प्रतिटन 2800 रुपये भाव दिला पाहिजे असे निर्देश दिले आहेत. ‘ज्ञानेश्वर’ने मात्र ऊस उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिटन 2100 रुपये भाव दिला आहे. उसाची एफआरपी कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार (Sugarcane FRP as per the recommendations of the Agricultural Value Commission) शेतकर्‍यांना हमीभाव मिळायला हवा होता. ज्ञानेश्वरने दिलेला 2100 रुपये भाव हा केवळ ऊसावर आधारित दिलेला आहे. भार्गव कमिटीच्या शिफारशीनुसार ऊस गाळप (SugarCane Galap) व साखर उत्पादन या व्यतिरिक्त कारखान्याचे इतर सर्व उपपदार्थ निर्मिती (Byproduct formation) मधील 50 टक्के नफा (Profit) शेतकर्‍यांना मिळाला।पाहिजे. या मागणीसाठी (Demand) आम्ही हे उपोषण केले.आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर न्यायालयात दाद मागू असेही मुरकुटे यावेळी म्हणाले.

सकाळी 10 ते सांयकाळी 5 वाजेपर्यंत हे उपोषण चालले. कार्यकारी संचालक अनिल शेवाळे व पोलीस निरीक्षक विजय करे (PI VIjay Kare) यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचेसह जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, भाजपचे जिल्हा सचिव अंकुश काळे, भाजपा जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्षा नजराना शेख, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, नेवासा शहर अध्यक्ष मनोज पारखे, सुभाष पवार, सुनील वाघ, ऋषिकेश शेटे, जनार्दन जाधव, अ‍ॅड. विश्वास काळे, बंडू आरगडे, यडूभाऊ सोनवणे आदी उपोषणात सहभागी झाले होते.

केंद्राच्या नियमाप्रमाणे एकरकमी एफआरपी अदा - शेवाळे

उपोषणकर्त्यांसमोर बोलताना कार्यकारी संचालक अनिल शेवाळे म्हणाले, कारखान्याने गळीत हंगाम 2020-21 मध्ये गाळप केलेल्या सर्व उसाची केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे निघणारी एफआरपीची रक्कम शेतकर्‍यांना एकरकमी अदा केलेली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com