
नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa
नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या वतीने काढण्यात येणार्या नेवासा ते पंढरपूर आषाढी पायी वारी दिंडीचे शनिवार दि.25 जून रोजी पंढरीकडे प्रस्थान होणार असून नाव नोंदणीसाठी वारकर्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानशी संपर्क साधावा असे आवाहन शिवाजी महाराज देशमुख यांनी केले आहे.
आषाढी पायी वारी दिंडी सोहळयाचे हे 53 वे वर्ष आहे. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणातून सकाळी 8 वाजता ही दिंडी निघणार असून बुधवार दि.6 जुलै रोजी पंढरपूरला पोहचणार आहे. सलग बारा दिवस पायी दिंडीचा प्रवास असून दिंडीच्या वाटेवर सकाळी नाष्टा, दुपारी अन्नदान, मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन व रात्री भोजन असा दिंडीतील नित्यक्रम रहाणार आहे.
संत ज्ञानेश्वर माउलींच्या या दिंडीमध्ये ज्यांना यायची ईच्छा असेल त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानशी संपर्क साधून योग्य ती भीशी भरून नावनोंदणी करावी असे आवाहन संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे श्री शिवाजी महाराज देशमुख, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, विश्वस्त विश्वासराव गडाख, भिकाजी जंगले, ज्ञानेश्वर शिंदे, माधवराव दरंदले, कैलास जाधव, रामभाऊ जगताप, कृष्णाभाऊ पिसोटे यांनी केले आहे.