‘ज्ञानेश्वर’च्या डिस्टीलरी विभागाच्या उत्पादन हंगामाची सांगता

दीड कोटी लिटर मद्यार्क तर 1 कोटी 37 लाख लिटर इथेनॉलची निर्मिती
‘ज्ञानेश्वर’च्या डिस्टीलरी विभागाच्या उत्पादन हंगामाची सांगता

भेंडा |वार्ताहर| Bhenda

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे डिस्टिलरीतून 273 दिवसांत बी-हेव्ही मोलासेसपासून 1 कोटी 48 लाख 39 हजार 84 लिटर मद्यार्क (रेक्टीफाईड स्पिरीट) निर्मिती केली. तर 255 दिवसांत 1 कोटी 37 लाख लिटर इथेनॉल निर्मिती झाल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी दिली.

भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे डिस्टीलरीच्या सन 2021-22 मधील 37 व्या उत्पादन हंगामाची सांगता कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्याहस्ते विधिवत पुजेने झाली. त्यावेळी ते बोलत होते.

श्री. अभंग म्हणाले, कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील व संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांचे नेतृत्वाखाली साखर कारखाना व डिस्टिलरीमध्ये विक्रमी उत्पादन झाले आहे. दि.15 नोव्हेंबर 2021 रोजी डिस्टिलरी विभागातील 45 हजार लिटर प्रतिदिन क्षमतेच्या प्रकल्पातून मद्यार्क निर्मितीला सुरुवात झाली. 275 दिवसांत बी-हेव्ही मोलासेसपासून 1 कोटी 48 लाख 39 हजार 84 लिटर मद्यार्क (रेक्टरीफाईड स्पिरीट) निर्मिती केली.तर 50 हजार लिटर प्रतिदिन उत्पादन क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्पातून दि.6 जानेवारी 2022 रोजी इथेनॉल निर्मितीला सुरुवात होऊन 255 दिवसांत 1 कोटी 37 लाख लिटर इथेनॉल निर्मिती पूर्ण होऊन बुधवार दि.15 ऑगस्ट रोजी डिस्टिलरी व दि.17 ऑगस्ट रोजी इथेनॉल निर्मिती हंगामाची सांगता झाल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी दिली.

यावेळी कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सचिव रवींद्र मोटे, संचालक अशोकराव मिसाळ, उत्पादन शुल्क निरीक्षक मुकुंद परांडकर, कामगार संचालक सुखदेव फुलारी, डिस्टिलरी इन्चार्ज महेंद्र पवार, तांत्रिक सल्लागार एम. एस. मुरकुटे, एस. डी. चौधरी, मुख्य अभियंता राहुल पाटील, नंदकिशोर चोथे, सिनिअर डिस्टिलरी केमिस्ट पराग कुलकर्णी, माणिकराव आदिक, कृष्णा बारगुजे, राजाराम काकडे, बाबासाहेब डांगे, अजय गडाख, जयवंत काळे, अशोक मुळीक, संभाजी साबळे, प्रकाश ढगे, गीताराम रोडगे, योगेश काळे, सोपानराव पागीरे, मनोहर गव्हाणे, सुनील काशीद, सुरक्षा अधिकारी सुनील देशमुख, कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे, प्रशासकीय अधिकारी कारभारी गायके, स्टोअर किपर नामदेव मुळे, विष्णूपंत वाबळे, संदीप पवार, देवराव चौधरी, शिवाजी मिसाळ आदी यावेळी उपस्थित होते. कामगार संचालक सुखदेव फुलारी यांनी प्रास्ताविक-सूत्रसंचालन केले. सिनिअर डिस्टिलरी केमिस्ट पराग कुलकर्णी यांनी आभार मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com