ज्ञानेश्वर साखर कारखाना कामगारांना पगारात 12 टक्के वेतनवाढ

कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र घुले पाटील यांची माहिती
ज्ञानेश्वर साखर कारखाना कामगारांना पगारात 12 टक्के वेतनवाढ
साखर कारखाना

भेंडा |वार्ताहर| Bhenda

येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना (Dnyaneshwar Cooperative Sugar Factory) कामगारांना नोव्हेंबर 2021 पगारात 12 टक्के वेतनवाढ (Pay Rise) लागू करण्याची घोषणा (Announcement) कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील (Former MLA Narendra Ghule Patil) यांनी केली.

मंगळवार दि.16 नोव्हेंबर रोजी लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना (Loknete Marutrao Ghule Patil Dnyaneshwar Sahakari Sugar Factory) संचालक मंडळची सभा अध्यक्ष नरेंद्र घुले पाटील (Factory Director Narendra Ghule Patil) यांचे अध्यक्षतेखाली व संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील (Former MLA Chandrasekhar Ghule Patil) यांचे प्रमुख उपस्थितीत झाली. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश आदिक (Maharashtra State National Sugar Workers Federation President Avinash Adik) व सरचिटणीस नितीन पवार यांनी जेष्ठ नेते खा.शरद पवार (Sharad Pawar) व राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्याने राज्यातील साखर कामगारांना 12 टक्के वेतनवाढ लागू करण्याचा त्रिपक्षीय समितीने करार केला व राज्य शासनाच्या कामगार विभागाने शासननिर्णय निर्गमित केला आहे.

त्यानुसार 1 एप्रिल 2019 पासून साखर कामगारांना 12 टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय ऑक्टोबर 2021 मध्ये झालेला आहे.या निर्णयाची अंमलबजावणी करीत ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे कामगारांना नोव्हेंबर 2021 च्या पगारात 12 टक्के वेतन वाढ देण्याचा निर्णय संचालक मंडळाचे सभेत घुले यांनी जाहीर केला.

यावेळी उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, जेष्ठ संचालक अड. देसाई देशमुख, विठ्ठलराव लंघे, काकासाहेब नरवडे, काशीनाथ नवले, काकासाहेब शिंदे, पंडितराव भोसले, डॉ. नारायणराव म्हस्के, भाऊसाहेब कांगुणे, जनार्दन कदम, बबनराव भुसारी, दीपक नन्नवरे, शंकरराव पावसे, सखाराम लव्हाळे, विष्णूपंत जगदाळे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सचिव रवींद्र मोटे आदी उपस्थित होते.

संचालक मंडळाने 12 टक्के वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष व कामगार संचालक सुखदेव फुलारी यांनी व्यवस्थापनाचे आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com