‘ज्ञानेश्वर’च्या प्रकल्पातून इथेनॉलचा पहिला टँकर गुजरातला रवाना

‘ज्ञानेश्वर’च्या प्रकल्पातून इथेनॉलचा पहिला टँकर गुजरातला रवाना

भेंडा |वार्ताहर| Bhenda

येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या प्रकल्पातून उत्पादित झालेल्या इथेनॉलचा पहिला टँकर गुजरात राज्यातील हाजीरा येथील भारत पेट्रोलियम कंपनीच्या ऑईल डेपोसाठी रवाना झाला आहे.

कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या हस्ते पहिल्या इथेनॉल टँकरचे पूजन करण्यात आले. यावेळी संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, काशिनाथ नवले, अशोकराव मिसाळ, शिवाजीराव कोलते, दादासाहेब गंडाळ, डॉ. शिवाजी शिंदे, कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, डिस्टीलरी इनचार्ज महेंद्र पवार, चिफ इंजिनिअर राहुल पाटील, प्रशासकीय अधिकारी कारभारी गायके, कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे, सीनिअर डिस्टिलरी केमिस्ट पराग कुलकर्णी, इंजिनिअर योगेश काळे, वेअर हाऊस सुपरवायझर सोपान पागिरे, अरविंद ठाणगे, इब्राहिम सय्यद, विष्णुपंत वाबळे, राजेंद्र काकडे आदीसह सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते.

कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र घुले पाटील म्हणाले, केंद्र शासनाने राबविलेल्या इथेनॉल निर्मिती धोरणास प्रतिसाद देत लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने उभारलेल्या 50 हजार लिटर प्रतिदिन इथेनॉल निर्मिती प्रकल्पाची उभारणी पूर्ण होऊन दि. 7 जानेवारी अखेर 14 लाख 6 हजार 365 लिटर इथेनॉल निर्मिती झालेली आहे. इथेनॉल पुरवठा वर्ष 2021-22 करीता 89 लाख 8 हजार लिटर इथेनॉल पुरवठा करण्याचा करार ऑईल कंपन्याशी करुन त्यांचे मागणीनुसार इथेनॉल पुरवठा करण्यात येणार आहे.

ऑईल कंपन्यांशी झालेल्या करारानुसार महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात राज्यातील संबंधीत कंपन्याच्या ऑईल डेपोला त्यांचे मागणीनुसार पेट्रोल मध्ये मिश्रण करण्यासाठी लागणारे 100 टक्के शुद्ध इथेनॉल पुरविण्यात येणार आहे. साखर कारखान्याने 7 जानेवारी अखेर 5 लाख 69 हजार 860 मे.टन ऊसाचे गाळप केले असून ही सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com