‘ज्ञानेश्वर’चे अनिल शेवाळे यांना उत्कृष्ठ कार्यकारी संचालक पुरस्कार जाहीर

‘ज्ञानेश्वर’चे अनिल शेवाळे यांना उत्कृष्ठ कार्यकारी संचालक पुरस्कार जाहीर

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा 2020-21 साठी उत्कृष्ठ कार्यकारी संचालक पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख 10 हजार रुपये,मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून लवकरच व्हिएसआयचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

श्री. शेवाळे हे 8 डिसेंबर 2000 रोजी ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यात चिफ केमिस्ट पदावर रुजू झाले. त्यानंतर 1 नोव्हेंबर 2007 रोजी त्यांनी कार्यकारी संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. आजतागायत ते कार्यकारी संचालक पदावर कार्यरत आहेत. जिल्ह्यात सर्वप्रथम 12 मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्पाची उभारणी,19.5 मेगावॅटच्या दुसच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची उभारणी, कारखाना गाळप क्षमतावाढ, डिस्टिलरी प्रकल्पाचे आधुनिकीकरण, इथेनॉल प्रकल्प उभारणी आदी प्रकल्प-यशस्वीरित्या पूर्ण करण्यात श्री.शेवाळे यांचे मोठे योगदान आहे. यापूर्वी त्यांना भारतीय साखर संस्थेचा उत्कृष्ठ कार्यकारी संचालक पुरस्कारही प्राप्त झालेला आहे.

पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील व माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी श्री. शेवाळे यांचे अभिनंदन केले. ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे वतीने कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक काकासाहेब नरवडे, काशिनाथ नवले, शिवाजीराव कोलते, अशोकराव मिसाळ, दादासाहेब गंडाळ,कामगार संचालक सुखदेव फुलारी, सचिव रवींद्र मोटे, तांत्रीक सल्लागार एम.एस.मुरकुटे,एस.डी. चौधरी, महेंद्र पवार, आप्पासाहेब खरड, शेंडगे, चीफ अकाउंटंट रामनाथ गरड, शेतकी अधिकारी सुरेश आहेर, जनसंपर्क अधिकारी कल्याण म्हस्के, विलास लोखंडे, कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे, विनोद गाडगे, डॉ. शिवाजीराव शिंदे, डॉ. अशोकराव ढगे, बापूसाहेब नजन आदी उपस्थित होते.

लोकनेते मारुतरावजी घुले पाटील साहेबांनी 2000 साली माझी चिफ केमिस्टपदी निवड करून मला संधी दिली. माजी आमदार नरेंद्र घुले पाटील व माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी 2007 साली कार्यकारी संचालक पदावर संधी दिली. स्वर्गीय मालकांचे आशीर्वाद, माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग, ज्येष्ठ संचालक अ‍ॅड.देसाई देशमुख यांचे सहकार्याने मी पुरस्कारापर्यंत पोहचू शकलो. हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून ज्ञानेश्वर उद्योग समूहातील प्रत्येक घटकांचा आहे.

- अनिल पं. शेवाळे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com