ज्ञानदेव दहातोंडे हत्येचा तपास लावा; मंगळवारी चांदा बंद

12 जुलैला रास्तारोकोचा इशारा; पोलीस अधिक्षकांना दिले निवेदन
ज्ञानदेव दहातोंडे हत्येचा तपास लावा; मंगळवारी चांदा बंद

चांदा |वार्ताहर| Chanda

नेवासा (Newasa) तालुक्यातील चांदा (Chanda) येथील तरुण ज्ञानदेव सोपान दहातोंडे याची हत्या (Dnyandev Sopan Dahatonde Murder) होऊन महिना उलटत आला तरी सदर प्रकरणातील आरोपींना अद्यापही अटक झाली नाही (accused have not yet been arrested) तसेच गावात गुंडगिरी, अवैध धंदे आदींचा बंदोबस्त करा या व इतर मागण्यांसाठी चांदा येथील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी आंदोलनाचे (Villagers Movement) रणशिंग फुंकले असून त्यासंदर्भात गृहमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले आहे तर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांनाही या निवेदनाची प्रत देण्यात आली.

चांदा येथील नदीजवळ (Chanda River) भरचौकात 3 जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ज्ञानदेव सोपान दहातोंडे (वय 42) या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या (Murder) करून हल्लेखोर पळून गेले होते. या घटनेला महिना उलटत आला असून अजुनही या प्रकरणातील आरोपींना अटक झाली नाही. या संदर्भात चांदा येथील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि प्रमुख ग्रामस्थांची बैठक झाली. त्यामध्ये पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सर्वांनीच तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा निर्णय घेतला.

निवेदनात म्हटले की, ज्ञानदेव दहातोंडे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी मोकाट असून दहातोंडे यांच्या नातेवाईकांनी तपासी अधिकार्‍यांना तपासाबाबत (About the investigation) विचारणा केली तर त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देऊन बोळवण केली जात आहे. गावात खुलेआम अवैध धंदे सुरू आहेत. दादागिरी, गुंडगिरी वाढली असून सामान्य जनतेला त्याचा प्रचंड त्रास होत आहे. गावात गावठी कट्ट्यासारखी हत्यारे मोठ्या प्रमाणावर असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या सर्व प्रकरणात पोलिसांकडून (Police) कोणतीच कारवाई होत नसून उलटपक्षी पोलिसांचे गुन्हेगारांना अभय असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

दहातोंडे हत्या प्रकरणाचा तपास लावावा (Investigation of Dahatonde murder case), गावातील गुंडगिरीचा बंदोबस्त करावा तसेच तपासात दिरंगाई करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी या प्रकरणाच्या तपास दुसर्‍या सक्षम अधिकार्‍यांकडे द्यावा या मागण्यांसाठी मंगळवार 6 जुलै रोजी गाव बंद ठेवण्यात येणार असून सकाळी बाजारतळावर निषेध सभा घेण्यात येणार आहे त्यानंतरही जर तपास लागला नाही तर नगर -औरंगाबाद रोडवरील (Nagar-Aurangabad Road) घोडेगाव चौफुला (Ghodegav Chowk) येथे 12 जुलै रोजी रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko Movement) करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्दक्ष संभाजीराव दहातोंडे, पंचायत समितीचे माजी सभापती कारभारी जावळे, अनिलराव अडसुरे, मुळाचे संचालक बाबुराव चौधरी, तंटामुक्ती अध्यक्ष मोहन भगत, राष्ट्रवादी सेलचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब जावळे, भाजपा तालुका उपाध्यक्ष कैलास दहातोंडे, माजी सरपंच डॉ. विकास दहातोंडे, माजी सरपंच संजय भगत, उपसरपंच चांगदेव दहातोंडे, बन्सीभाऊ गायकवाड, ज्ञानदेव दहातोंडे, सुदाम जावळे, ग्रामपंचायत सदस्य पोपट दहातोंडे, नितीन दहातोंडे, अ‍ॅड. योगेश दहातोंडे, अरूण दहातोंडे, शिवाजी दहातोंडे, संतोष दहातोंडे, आण्णा दहातोंडे, शरद दहातोंडे, बाबासाहेब दहातोंडे, सुजित दहातोंडे आदींसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com