डी. जे. लावून रामनवमी मिरवणूक; गुन्हा दाखल

कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद
डी. जे. लावून रामनवमी मिरवणूक; गुन्हा दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रामनवमी मिरवणूकीत ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा मोठ्या आवाजात डी. जे. लावून मिरवणूक काढल्याप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्या अहमदनगर शहर प्रमुखासह दोघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर प्रमुख घनश्याम दत्तात्रय बोडखे व डी. जे. मालक आशिष भीमराज कसबे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलीस नाईक योगेश खामकर यांनी फिर्याद दिली आहे. रविवार, 10 एप्रिल, 2022 रोजी सायंकाळी अहमदनगर शहरातील कोहीनुर कापड दुकानासमोर एम. जी. रोड येथे हिंदू राष्ट्र सेनेचे अहमदनगर शहर प्रमुख बोडखे व डी. जे. मालक कसबे यांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची नोटीस देऊन देखील श्रीरामनवमी उत्सवानिमित्त डी. जे. लावून मिरवणूक काढली. सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा मोठ्या आवाजात म्हणजे 108.7 डेसीबल इतक्या मोठ्या प्रमाणात डी. जे. वाजवून ध्वनी प्रदूषण केले.

सदर ठिकाणावरून ये जा करणार्‍या नागरिकांना व घटना स्थळाचे आसपास राहणारे नागरिकांना त्रास होईल असे वर्तन करून व पोलिसांनी डी. जे. चा आवाज कमी करण्याबाबत दिलेल्या सूचनांचे उल्लंघन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपीविरूध्द भादंवि कलम 188, 186, 34, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 3, 15 व ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 चे कलम 3, 4, 5, 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी डीजेचा मिक्सर ताब्यात घेतला आहे.

Related Stories

No stories found.