दीपावली सुट्टीनिमित्त साईबाबांच्या दानपेटीत 18 कोटी दान

दीपावली सुट्टीनिमित्त साईबाबांच्या दानपेटीत 18 कोटी दान

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबांच्या दानपेटीत दीपावली उत्सवानिमित्त 17 कोटी 77 लाख 53 हजार रुपयांचे दान भाविकांनी साईचरणी अर्पण केले आहे.

दिवाळी सुट्टीच्या कालवधीत साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो भावी साईचरणी नतमस्तक होण्याकरिता शिर्डीत येतात. 20 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर यादरम्यान साई समाधी दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी साईबाबांच्या दानपेटीत भरभरून दान टाकले. यामध्ये जवळपास 17 कोटी 77 लाख 53 हजार 312 रुपयाचे दान जमा झाले आहे.

यामध्ये देणगी काउंटरवर 7 कोटी 54 लाख 45 हजार 408 रुपये व दक्षिणा पेटीत 3 कोटी 11 लाख 79 हजार 154 रुपये जमा झाले. ऑनलाईन पद्धतीने 1 कोटी 45 लाख 42 हजार 808 रुपये, चेक, डीडी याद्वारे 3 कोटी 3 लाख 55 हजार 946 रुपये, मनिऑर्डरद्वारे 7 लाख 28 हजार 833 रुपये, डेबीट, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 1 कोटी 84 लाख 22 हजार 426 रुपये जमा झाले.

29 देशांतील विदेशी भाविकांनी 24 लाख 80 हजार 701 रुपयांचे परकीय चलन आहे. 5 लाख 45 हजार 977 रुपये किंमतीची 13 हजार 345.970 ग्रॅम चांदी आणि 39 लाख 53 हजार 29 रुपये किंमतीचे 860.450 ग्रॅम सोने असे जमा झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com