फटाका विक्रेत्यांना हवा विक्री परवाना ऑनलाईन

फटाका विक्रेत्यांना हवा विक्री परवाना ऑनलाईन

अहमदनगर (प्रतिनिधी) -

दिवाळी सण (Diwali Festival) तोंडावर आल्याने शहरात फटाके विक्रीचे परवाने ऑनलाईन (Fireworks sale licenses online) पद्धतीने द्यावेत, अशी मागणी अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्यावतीने (Ahmednagar Fireworks Traders Association) जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले (Collector Rajendra Bhosale) यांना यांच्याकडे करण्यात आली.

असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी यावेळी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. फटाका व्यवसाय (Fireworks business) हा दिवाळी काळासाठी मर्यादीत असतो. सध्या करोना संकटामुळे (Corona Crisis) फटाका व्यापार्‍यांवर (firecracker traders) आर्थिक संकट कोसळले आहे. दिवाळीच्या कालावधीमध्ये उलाढाल मंदावल्यास व्यापार्‍यांवर आर्थिक संकट निर्माण होईल. फटाके विक्रीत्यांना परवाना एक महिना आधी दिल्यास शासनाच्या नियमांचे उल्लंघन न होता फटाका खरेदी ग्राहकांना गर्दी न करता करता येईल. विक्री परवाने उशिरा मिळाले तर व्यापारी व ग्राहकांना अनेक संकटांना समोरे जावे लागेल.

करोना स्थिती लक्षात घेवून उत्तर प्रदेश सरकारने नुकतेच फटाका विक्री परवाने ऑनलाईन पद्धतीने एक महिना आधी उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिल आहेत. महाराष्ट्र सरकारने देखील परिस्थितीचा विचार करुन फटाका विक्री परवाना ऑनलाईन पद्धतीने एक महिना आधी द्यावे, अशी संघटनेची मागणी आहे. असोसिएशनचे सहसेक्रेटरी अरविंद साठे, कार्याध्यक्ष सुरेश जाधव, सदस्य सुनील गांधी, संजय सुराणा, अनिल टकले, संतोष तोडकर, उमेश क्षिरसागर आदी यावेळी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com