हिंडफिर्‍यांची अँन्टीजेन

हिंडफिर्‍यांची अँन्टीजेन

विभागीय आयुक्तांचे आदेश । कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्या

अहमदनगर l Ahmednagar

नगर शहरात महापालिकेने कडक लॉकडाऊन लावल्यानंतरही रस्त्यावर गर्दी कायम आहे. त्याला आवर घालण्यासाठी आता चौकाचौकात हिंडफिर्‍यांची अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्याची सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जिल्हा प्रशासनाला केली. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील किमान 20 जणांचे टेस्टींग महापालिकेने करावे, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील वाढता करोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांचा आज विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आढावा घेतला.

पुढील १० दिवसात संभाव्य रुग्णांची संख्या लक्षात घेऊन किमान एक हजार ऑक्सीजन बेड्सची उपलब्धता वाढविण्याचे नियोजन करण्यात आले असून तालुकास्तरावर ऑक्सीजन बेडस्ची संख्या वाढविण्याबरोबरच व्हेंटिलेटरची उपलब्धता वाढविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. विनाकारण रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यांची अँटीजेन चाचणी करण्यासाठी अँटीजेन कीटस् उपलब्ध करुन देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनीही आता करोना संसर्गाची गती पाहता प्रतिबंधात्मक नियमांची स्वताहून अंमलबजावणी केली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

विभागीय आयुक्त गमे यांनी आज अहमदनगर येथे भेट दिली. यावेळी येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे करोना प्रतिबंधक उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. विभागीय उपायुक्त गोरक्षनाथ गाडीलकर, जिल्हाधिकारी डॉ राजेंन्द्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मनपा आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुनील पोखरणा, उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी उदय किसवे, उर्मिला पाटील, उज्ज्वला गाडेकर, जयश्री आव्हाड, रोहिणी नऱ्हे, मनपा उपायुक्त यशवंत डांगे, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके आदींची यावेळी उपस्थिती होती.

हिंडफिर्‍यांची अँन्टीजेन
लॉकडाऊनमध्ये चिंचेमुळे अनेकांच्या आयुष्यात गोडवा!

यावेळी गमे यांनी जिल्ह्यातील करोना संसर्गासंदर्भातील सद्यस्थिती, रुग्णवाढ, कोणत्या भागात जास्त प्रादुर्भाव आहे, त्याची कारणे, त्याठिकाणी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, रेमडेसीवीर उपलब्धता आणि वितरण, लसीकरण मोहिम, आरटीपीसीआर आणि अँटीजेन चाचण्यांचे तालुकानिहाय प्रमाण, रुग्णबाधित निघण्याचे प्रमाण याबाबत तपशीलवार माहिती घेतली. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जिल्हा प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांना दिली, करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी महानगरपालिका क्षेत्र, जिल्ह्याचा इतर नागरी भाग तसेच ग्रामीण भागातील उपाययोजना आणि प्रतिबंधक कार्यवाहीची माहिती यावेळी त्यांना देण्यातआली.

विभागीय आयुक्तांनी या वेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्याशीही संवाद साधला. त्याठिकाणी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी घेतली. तालुकापातळीवरील आरोग्य सेवा बळकट केल्या तर जिल्हापातळीवरील ताण काही प्रमाणात कमी करण्यास मदत होऊ शकेल, तसेच तालुकापातळीवरच उपचार मिळाल्याने रुग्ण लवकर बरे होतील, त्यादृष्टीने ऑक्सीजन बेडस आणि व्हेंटिलेटरची उपलब्धता वाढविण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणांनी कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. रेमडेसीवीर इंजेक्शनच्या बाबतीतही ते रामबाण औषध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या वापराबाबत रुग्णांती स्थिती पाहून डॉक्टरच निर्णय घेऊ शकतात, असे त्यांनी सांगितले,

हिंडफिर्‍यांची अँन्टीजेन
Video : लसीकरण केंद्रातूनच संसर्गाची भिती!

ऑक्सीजनची उपलब्धता आता बऱ्यापैकी होत आहे. मात्र, जिल्ह्यातील बेड्स संख्या वाढविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. याशिवाय, प्रत्येक तालुक्यासाठी १०० ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी स्तरावर त्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयासाठी प्रत्येकी दोन ड्युरा सिलींडरचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ऑक्सीजननिर्मितीच्या १२ प्रकल्पांनाआता मंजूरी मिळाली आहे, त्याचेही काम लवकरच सुरु होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात करोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींच्याही आरटीपीसीआर चाचण्या होणे गरजेचे आहे. किमान एका बाधित रुग्णामागे किमान २० व्यक्तींच्या चाचण्या केल्या जाणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

शहराचा लोड कमी करण्यासाठी..!

नगर शहरातील हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याकरीता जिल्हाभरातून बाधित येतात. त्यामुळे बेड अपुरे पडत आहेत. त्यावर तालुकास्तरावर ऑक्सिजन बेड वाढविण्याची सूचना विभागीय आयुक्त गमे यांनी केली. तसे केले तर तालुक्याचे पेशंट नगर शहरात येणार नाही. त्यामुळे नगर शहरावर येणारा लोड कमी होईल. त्यादृष्टीने उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com