नगर तहसील कार्यालयाचे विभाजन

राज्य उपसचिवांचे आदेश; नगर शहरासाठी अतिरिक्त तहसीलदार पद
नगर तहसील कार्यालयाचे विभाजन

अहमदनगर (प्रतिनिधी)

नगरमधील वाढते औद्योगिकीकरण, नागरीकरण व तालुक्यातील रहिवास क्षेत्राचा झपाट्याने झालेला विस्तारामुळे नगर तहसील कार्यालयावर कामाचा मोठा ताण पडत होता. प्रशासकीय सोयीसाठी नगर तालुका आणि नगर शहर अतिरिक्त तहसील कार्यालय असे विभाजन करण्यात आले आहे. राज्याचे उपसचिव संतोष गावडे यांनी याबाबतचा अध्यादेश काढला आहे.

नगर जिल्ह्यातील नगर आणि नेवासा तालुक्यांच्या तहसील कार्यालयांचे विभाजन प्रस्तावित होते. नेवासा तहसील कार्यालयाचे विभाजन करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुधीर वैरागर यांनी 2015 पासून केली आहे. प्रशासकीय पातळीवर 30 डिसेंबर 2020 रोजी विभाजनासाठीचा अहवाल मागविण्यात आला. या संदर्भात मंत्रालयात सोमवारी (दि.16) बैठक झाली. या बैठकीत नगर तहसील कार्यालयाचे विभाजन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

नगर शहरासाठी अतिरिक्त तहसीलदार हे पद निर्माण करण्यात आले आहे. त्यांच्या मदतीसाठी एक महसूल सहायक (लिपिक) पद निर्माण करण्यात आले आहे. महाराष्ट्र जमिन महसूल संहिता 1966 चे कलम 13 च्या पोट-कलम (3) नुसार, अतिरिक्त तहसीलदार, नगर शहर यांना तहसीलदारांचे सर्व अधिकार हे कार्यक्षेत्रासाठी राहणार आहेत. नगर शहर अतिरिक्त तहसीलदारांकडे 5 महसूल मंडळे आणि 12 गावांचा समावेश राहणार आहे. नालेगाव (5 गावे), सावेडी (2 गाव), केडगाव (1 गाव), भिंगार (1 गाव), नागापूर (3 गावे)

नगर तहसीलमध्ये 11 मंडळांचा समावेश

नगर तहसील कार्यालयाकडे 11 मंडळे आणि 109 गावे राहणार आहेत. यामध्ये नालेगाव (3 गावे), सावेडी (2 गावे), कापूरवाडी(9 गावे), केडगाव (8 गावे), भिंगार (14 गावे), नागापूर (12 गावे), जेऊर (12 गावे), चिचोंडी पाटील (13), वाळकी (10 गावे), चास ( 13 गावे), रूईछत्तीसी (13)

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com