शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्हानिहाय मागविले अभिप्राय

जिल्ह्याच्या सहमतीनूसार परीक्षा होण्याची शक्यता
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्हानिहाय मागविले अभिप्राय

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शिष्यवृत्तीसाठी ( Scholarship) जिल्ह्यातून 47 हजार विद्यार्थी प्रविष्ट (Students entered) झाले आहेत. मात्र, करोना प्रार्दुभावामुळे (Covid 19) अनेक वेळा तयारी करून ऐनवेळी परीक्षा (Exam) पुढे ढकलण्याची वेळ आलेली आहे. आता करोनाचा संसर्ग (Corona infection) कमी झाला असला तरी शिष्यवृत्तीची परीक्षा (Scholarship Exam) घ्यावी की नाही, याबाबत राज्य परीक्षा परिषदेने (State Examination Council) जिल्हानिहाय परीक्षेबाबत अभिप्राय मागवला (Feedback requested) असून राज्यभरातून हे अभिप्राय आल्यानंतर परीक्षेबाबत निर्णय होणार आहे.

याबाबत दोन दिवसांपूर्वी राज्यातील (State) सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (Education Officer of Zilla Parishad) यांची व्हिसी (ऑनलाईन बैठक) (VC. Online Meeting) झाली. यात शिष्यवृत्ती परीक्षेबाबत प्रत्येक जिल्ह्याने अभिप्राय पाठविण्यास सांगण्यात आले. हा अभिप्राय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (Zilla Parishad CEO) यांच्या सहीने पाठविण्यात येणार असून त्यात जिल्ह्यातील करोना परिस्थिती, परीक्षा घेणे योग्य आहे की नाही, या मुद्यावर अभिप्राय द्यावा लागणार आहे.

दरम्यान नगर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने (Nagar Zilla Parishad Education Department) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (Scholarship Exam) एप्रिल महिन्यांत तयार करून ठेवलेली आहे. यात पाचवीचे 225 तर आठवीचे 143 केंद्र निश्‍चित करण्यात आले (center was fixed) आहेत. यापूर्वी राज्य शासनाच्या (State Government )वतीने 23 मे रोजी पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आली होती. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून 2 हजार 19 शाळांच्या 47 हजार 76 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. यात 30 हजार 115 पाचवीचे विद्यार्थी, तर 16 हजार 961 आठवीचे विद्यार्थी आहेत.

सराव परीक्षेला संसर्ग

करोना संसर्गामुळे यंदा शिष्यवृृत्तीचे परीक्षेसाठी जिल्हा पातळीवरून एकही ऑफलाईन सराव परीक्षा घेता आली नाही. मात्र, राहाता आणि कोपरगाव तालुक्यांसह अन्य तालुक्यात ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने सराव परीक्षा झालेल्या आहेत. जिल्ह्यात करोना संसर्ग कमी झाल्यास शिष्यवृत्ती परीक्षा होण्याची शक्यता शिक्षण विभागातून व्यक्त होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com