लवकरच नव्याने जिल्हा वाहतूक शाखा कार्यान्वित होणार

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची माहिती
लवकरच नव्याने जिल्हा वाहतूक शाखा कार्यान्वित होणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये नागरीकरणात वाढ होत आहे. त्यामुळे रहदारी वाढत आहे. वाहतूक नियंत्रणासाठी सध्या जिल्ह्यातील नगर व शिर्डी या दोन शहरातच वाहतूक शाखा अस्तित्वात आहे. आता जिल्हास्तरावर जिल्हा वाहतूक शाखेची स्थापना करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.

नगर येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात जिल्हा वाहतूक शाखेचे कार्यालय सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वी अधीक्षक राकेश ओला यांनी केलेल्या बदल्यांमध्ये पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांची जिल्हा वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच या विभागात आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येतील. शाखेचे कामकाज व जबाबदार्‍या निश्चित करून लवकरच जिल्हा वाहतूक शाखेचे कार्यालय कार्यान्वित करण्यात येणार आहे.

नगर शहर, शिर्डी वाहतूक शाखा, महामार्ग पोलीस व जिल्हा वाहतूक शाखा यांच्या समन्वयातून वाहतूक नियोजन व नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या जातील, असेही अधीक्षक ओला यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com