रोहोकले यांच्या कार्यकाळापासून बँकेला आर्थिक स्थैर्य

जिल्ह्याला वास्तव मान्यच करावे लागेल - मिनाक्षी तांबे
रोहोकले यांच्या कार्यकाळापासून बँकेला आर्थिक स्थैर्य

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेतील गुरूमाऊलीच्या सत्तांतरापुर्वीचा काळ आठवला तर बँकेत प्रचंड आर्थिक अस्थैर्य निर्माण झाले होते. अनियमित कर्ज पुरवठ्यामुळे सभासदही त्रस्त झालेला होता. मासिक वसूल आल्याशिवाय कर्ज रोखे होत नव्हते. शिक्षक बँकेचा हा आर्थिक अस्थैर्याचा काळ जिल्ह्याने अनुभवला आहे, म्हणूनच रावसाहेब रोहोकले यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत सभासदांनी शिक्षक बँकेची एकहाती सत्ता गुरूमाऊलीच्या ताब्यात दिली, असे प्रतिपादन शिक्षक परिषदेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मिनाक्षी तांबे यांनी केले आहे.

रोहोकले यांनी अत्यंत सचोटीने, प्रामाणिकपणे काम करतांना बँके विषयी सर्वसामान्यांच्या मनात पुन्हा एकदा विश्वास निर्माण केला. त्यामुळे साडेतीन वर्षात ठेवीत 541 कोटीवरून प्रचंड वाढ होत बँकेकडील ठेवी 845 कोटीवर पोहोचल्या. परिणामी कर्ज रक्कमेत मोठ्या प्रमाणात वाढ करूनही कर्ज पुरवठा सुरळीत ठेवण्यात रोहोकले यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाला शक्य झाले. या साडेतीन वर्षात विरोधकांना भ्रष्टाचाराचा एकही आरोप गुरूजींवर करता आला नाही.

म्हणूनच रोहोकलेंच्याच कार्यकाळापासून शिक्षक बँकेला आर्थिक स्थैर्य मिळाले हे वास्तव जिल्ह्याला मान्यच करावे लागेल. मंडळाअंतर्गत व बाह्यविरोध असूनही केवळ सभासदहित हाच अजेंडा ठेवून काम करणार्‍या गुरूजींनी कुटूंबआधार सारख्या अनेक योजना सुरू केल्या. सुरूवातीच्या साडेतीन वर्षात शिक्षक बँकेला आर्थिक शिस्त लागून बँकेची नफा शक्ती वाढवण्यासाठी काही कठोर निर्णय घेतले गेले. तसेच सभासदांव्यतिरिक्त सर्वसामान्यांच्या बँकेवरील वाढलेल्या विश्वासामुळे बाह्य ठेवीवरील व्याज कमी करूनही या बाह्य ठेवीमध्ये झालेली प्रचंड वाढ परिणामी कर्ज वितरण मोठ्या प्रमाणावर वाढले त्यामुळे नफा शक्ती मोठ्याप्रमावर वाढली, असे तांबे यांनी स्पष्ट केले आहे.

शताब्दी वर्षानिमित्ताने सावित्रीच्या लेकी कार्यक्रमातून सत्तारूढ तांबे मित्रमंडळाने जिल्ह्यातील महिला भगिंनींचा सन्मान करणे शक्य असतानाही मोजक्याच 150 महिलांचा बँकेच्या खर्चातून केलेला सन्मान आजही 4 हजार 500 हजार महिला भगिणी विसरलेल्या नाहीत. त्यामुळे सावत्रपणाची वागणूक देऊन क्रुर चेष्ठा करणार्‍यांना या महिलांनी वेळोवेळी जाबही विचारल्याचे अनेक प्रसंग जिल्ह्याने पाहिले आहेत.त्यामुळे या बंडखोरांनी कुणाशीही युती केली. तरीही यांना जिल्ह्यातील महिला भगिनी जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत, असे तांबे यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.