जिल्हा शिक्षक पुरस्कारांसाठी परीक्षण पूर्ण

जिल्हा स्तरीय समितीत नावे होणार अंतिम
जिल्हा शिक्षक पुरस्कारांसाठी परीक्षण पूर्ण

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्हा शिक्षक पुरस्कारांच्या (District Teacher Award) निवडीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून तालुका पातळीवरून शिक्षकांच्या प्रस्तावांचे परीक्षण पूर्ण (Test of teacher proposals completed) त्याचा अहवाल जिल्हा पातळीवर आला (Report at district level) आहे. आता जिल्हा पातळीवर असणार्‍या समितीच्या बैठकीत शिक्षकांना (Teacher) मिळणार्‍या गुणानूसार गुणांकन करून पुरस्कारासाठी नावे अंतिम करण्यात येणार आहेत. त्यानंतर ते मान्यतेसाठी विभागीय आयुक्त (Divisional Commissioner) यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत.

दरवर्षी शिक्षक दिनाच्या (Teacher Day) दिवशी (5 सप्टेंबरला) जिल्हा परिषद (Zilla Parishad) पातळीवरून 14 तालुक्यातून प्रत्येकी एक यानूसार 14 आणि केंद्र प्रमखांतून उत्तर आणि दक्षिण असे दोन पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. या पुरस्कारांच्या निवडीसाठी जिल्हा पातळीवर निवड समिती असून तत्पूर्वी शिक्षकांनी (Teacher) स्वत: भरून दिलेल्या माहितीची तालुका पातळीवर परीक्षण करण्यात येते. या पुरस्कारांसाठी प्रत्येकी तालुक्यातून 3 शिक्षक यात महिला शिक्षक आणि एका केंद्रप्रमुख यांच्या प्रस्तांवाचे परीक्षण करण्यात येते. शंभर गुणांच्या परीक्षणानूसार प्रत्येक तालुक्यातून तीन असे 42 तर आणि केंद्र प्रमखांच्या आलेल्या प्रस्तावानूसारची नावे जिल्हा स्तरावर पाठविण्यात येतात. यंदा मात्र, केंद्र प्रमुखांचे अवघे चार प्रस्ताव आले असून यातून एकाच नावावर शिक्कामोहर्तब होणार आहे.

दरम्यान, तालुका पातळीवरून आलेल्या नावांचे परीक्षण पुर्ण होवून गुणाकंनासह यादी (List) जिल्हा पातळीवर (District Level) आली आहे. जिल्हा पातळीवर असणार्‍या समितीचे अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्षा (Zilla Parishad President) असून समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) हे उपाध्यक्ष आहेत. तर शिक्षणाधिकारी (Education Officer) प्राथमिक हे सचिव, उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती हे सदस्य, महिला आणि बालकल्याण समिती सभापती, समाज कल्याण समिती सभापती, माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि जिल्ह्यातील डीएड्, बीएड् कॉलेजच्या प्राचार्याचे प्रतिनिधी यांचा सदस्य म्हणून सामावेश आहे. या समितीची येत्या दोन दिवसांत बैठक होणार असून त्यानंतर पुरस्कारार्थी शिक्षकांची नावे अंतिम (The names of the award winning teachers will be final) होणार आहे.

परीक्षेबाबत संभ्रम

या पुरस्कारसाठी जिल्हा पातळीवर 25 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येते. त्यात मिळणारे गुण आणि तालुक्यात परिक्षात मिळणार्‍या गुण यातील टॉपवर नावांची यादीवर जिल्हा स्तरीय निवड समिती चर्चा होवून अंतिम यादी तयार होते. यंदा मात्र, 25 गुणांच्या परीक्षेबाबत संभ्रम अवस्था आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com