जिल्हा शिक्षक पुरस्कारसाठी तालुकानिहाय परीक्षण सुरू

त्रिसदस्यी समिती तपासणार प्रस्ताव || लेखी परीक्षेनंतर निवड समिती करणार नावे अंतिम
जिल्हा शिक्षक पुरस्कारसाठी तालुकानिहाय परीक्षण सुरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा शिक्षक पुरस्कारांच्या निवडीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. मंगळवार (दि.17) पासून तालुकानिहाय पुरस्कारासाठी आलेल्या प्रस्तावांची त्रिसदस्यीय समितीकडून परीक्षण सुरू करण्यात आले आहे. या समितीत गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी शिक्षण आणि केंद्रप्रमुखांचा समावेश असून एका तालुक्यातील ही समिती दुसर्‍या तालुक्यात जाऊन आलेले प्रस्ताव तपासणार आहेत.

दरवर्षी शिक्षक दिनाच्या दिवशी जिल्हा परिषद पातळीवरून 14 तालुक्यांतून प्रत्येकी एक यानुसार 14 आणि केंद्रप्रमुखांतून उत्तर आणि दक्षिण असे दोन पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. या पुरस्कारांच्या निवडीसाठी जिल्हा पातळीवर निवड समिती असून तत्पूर्वी शिक्षकांनी स्वत: भरून दिलेल्या माहितीचे तालुका पातळीवर परीक्षण करण्यात येते. या पुरस्कारांसाठी प्रत्येकी तालुक्यातून 3 शिक्षक यात महिला शिक्षक आणि एक केंद्रप्रमुख यांच्या प्रस्तावांचे परीक्षण करण्यात येते. शंभर गुणांच्या परीक्षणानुसार प्रत्येक तालुक्यातून तीन असे 42 तर आणि केंद्र प्रमुखांच्या आलेल्या प्रस्तावानुसारची नावे जिल्हा स्तरावर पाठविण्यात येतात. ही सर्व नावे तालुका पातळीवर असणार्‍या त्रिस्तरीय समितीच्या गुणांकनावर आधारीत असतात. यंदा मात्र, केंद्र प्रमुखांचे अवघे चार प्रस्ताव आले असून यातून एकाच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

दरम्यान या पुरस्कारसाठी जिल्हा पातळीवर 25 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येत असून त्यात मिळणारे गुण आणि तालुक्यात परिक्षात मिळणार्‍या गुण यातील टॉपवर नावांची यादी जिल्हा स्तरावर असणार्‍या निवड समितीकडे पाठविण्यात येतात. या समितीचे अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्षा असून समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी हे उपाध्यक्ष आहेत. तर शिक्षणाधिकारी प्राथमिक हे सचिव, उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती हे सदस्य, महिला आणि बालकल्याण समिती सभापती, समाज कल्याण समिती सभापती, माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि जिल्ह्यातील डीएड्, बीएड् कॉलेजच्या प्राचार्याचे प्रतिनिधी यांचा सदस्य म्हणून सामावेश आहे. येत्या 24 तारखेपर्यंत 14 तालुक्यातून शिक्षकांच्या प्रस्तावांचे परिक्षण पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर 25 गुणांची परीक्षा घेवून अंतिम यादी फायनल करण्यासाठी ती जिल्हा निवड समितीकडे सादर करण्यात येणार आहे.

जिल्हा शिक्षक पुरस्कारांसाठी शिक्षकांची निवड अंतिम झालयावर पोलीस पडताळणीनंतर संबंधीत यादी ही विभागीय आयुक्त यांच्या मान्येतला पाठविण्या येणार आहे. यामुळे महिनाअखरे जिल्हा शिक्षक पुरस्कारांसाठी पुरस्कारांर्थी निवड अंतिम करण्यात येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com