
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर जिल्ह्यातील सहा तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश महसूल विभागाच्यावतीने काढण्यात आले आहेत. यात सहा तहसीलदार जिल्ह्याबाहेर तर तिनजण जिल्ह्यात रिक्त झालेल्या जागेवर बदलून आले आहेत. असे असले तरी जिल्ह्यातील तीन तहसीलदारांच्या जागा रिक्त आहेत.
महसूल विभागाच्यावतीने जिल्ह्यातील तहसीलदार यांची महाराष्ट्र शासकीय कर्मचार्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणार्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 नूसार बदल्या केल्या आहेत. यात नगरच्या सामान्य प्रशासन विभागाच्या तहसीलदार वैशाली आव्हाड यांची तहसीलदार कुळ कायदा नाशिक या पदावर, श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांची चाळीसगावच्या तहसीलदार पदावर, राहात्याचे तहसीलदार कुंदर हिरे यांची विशेष कार्यकारी दंडाधिकारी अहमदनगर तथा तहसीलदार आस्थापना विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक, नरेशकुमार बहिरम तहसीलदार नाशिक या पदावर, चंद्रशेखर शितोळे तहसीलदार निवडणूक नगर जिल्हाधिकारी कार्यालय यांची जिल्हाधिकारी कार्यालय सातार येथे रिक्त होणार्या पदावर, अमोल निकम तहसीलदार संगमनेर यांची तहसीलदार नाशिक या पदावर बदल्या झाल्या आहेत.
तर चाळीसगावचे तहसीलदार अमोल मोरे यांची राहाता तहसीलदार पदावर, अंमळनेरचे तहसीलदार मिलींदकुमार वाघ यांची नगरच्या निवडणूक शाखेत तहसीलदार पदावर, नियुक्तीच्या प्रतिक्षेत असणारे चंद्रजित राजपूत यांची राहुरीच्या तहसीलदार पदावर बदली झाली आहे. बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर न होणार्या अधिकार्यांवर शिस्तभंगाची कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.