जिल्हा शल्यचिकित्सकांच्या शासकीय वाहनाला आग

जिल्हा शल्यचिकित्सकांच्या शासकीय वाहनाला आग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्या शासकीय वाहनाने सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक पेट घेतल्याने एकच धावपळ उडाली. प्रसंगावधान दाखवत जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचार्‍यांनी प्रतिरोधक किटचा वापर करून आग नियंत्रणात आणली.

शल्य चिकित्सक डॉ. पोखरणा हे दुपारी चारच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातील एक बैठक आटोपून शासकीय कारने जिल्हा रुग्णालयात आले होते. त्यानंतर काही वेळातच रुग्णालयाच्या दर्शनी भागात उभ्या केलेल्या शासकीय कारच्या बोनेट मधून धूर आणि आग दिसून आली. बघता-बघता कारच्या पुढील भागातून आगीच्या ज्वाला भडकू लागल्या. अचानक कारला आग लागल्याने सर्वांचीच धावपळ उडाली. या दरम्यान रुग्णालयात असलेल्या फायर सेफ्टीने वायूचा मारा करत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com