डॉ. पोखरणा यांना अटकपूर्व जामीन

जिल्हा रूग्णालय आगप्रकरण
डॉ. पोखरणा यांना अटकपूर्व जामीन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा रूग्णालयाचे निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. रूग्णालयातील आगप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात एका वैद्यकीय अधिकार्‍यासह चार परिचारिकांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात डॉ. पोखरणा यांना अटक होईल, याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. जिल्हा शल्यचिकित्सक हे देखील निलंबित असल्याने त्यांना अटक होण्याची शक्यता होती. त्यातून त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांच्या न्यायालयात त्यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली. डॉ. पोखरणा यांच्यावतीने वकील प्रकाश कोठारी यांनी बाजू मांडली. डॉ. पोखरणा यांना तपासी अधिकार्‍यांना तपासात सहकार्य करावे, असे आदेश दिले आहेत. दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे शनिवारी नगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. जिल्हा रूग्णालयातील आगप्रकरणी त्यांनी पत्र परिषद घेत आरोग्यमंत्र्यांसह जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com