शेखर पाटील
शेखर पाटील
सार्वमत

नूतन क्रीडा अधिकारी यांचे स्वागत

शेखर पाटील : करोना काळात क्रीडा शिक्षकांनी खेळांडूचे मनोबल कायम ठेवावे

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्ह्याने भारतीय क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. येथील क्रीडा शिक्षक तसेच क्रिडा संघटना अतिशय सकारात्मक आहेत. सध्या करोनाचे संकट असले तरी क्रीडा शिक्षकांनी खेळाडूंशी सातत्याने संपर्कात राहून त्याचे समुपदेशन करावे.

यातून भविष्यात जेव्हा प्रत्यक्ष स्पर्धा, सराव सुरू होईल तेव्हा खेळाडू आपले कौशल्य नव्याने सिध्द करण्यासाठी सक्षम राहतील, अशी भूमिका नूतन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी मांडली.

नगरला नियुक्ती झाल्यानंतर पाटील यांनी बुधवारी पदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी त्यांचे विविध क्रीडा संघटना, खेळाडूंच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे उपाध्यक्ष शैलेश गवळी, सायकलिंग असोसिएशनचे सचिव प्रा.संजय साठे,घनश्याम सानप, सतीश गायकवाड, राष्ट्रीय खेळाडू पवन सारडा, प्रताप भापकर, अमोल काजळे, राजेंद्र कोतकर आदी उपस्थित होते.

शैलेश गवळी म्हणाले की, जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रात अनेक गुणी खेळाडू, अनुभवी क्रीडा मार्गदर्शक आहेत.या सर्वांना चांगले व्यासपीठ मिळवून देत क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी क्रीडा विभागाकडून अपेक्षा आहेत.

नूतन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील हे सर्वांना सोबत घेऊन क्रीडा क्षेत्राला चालना देतील, असा विश्वास आहे. त्यांना याकामी सर्व संघटना, खेळाडूंचे सहकार्य राहील, अशी ग्वाही गवळी यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com