जिल्ह्यातील सहा पोलिसांना 'पोलीस महासंचालक' पदक जाहिर

जिल्ह्यातील सहा पोलिसांना 'पोलीस महासंचालक' पदक जाहिर

अहमदनगर|Ahmednagar

पोलीस दलात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनिय प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे पोलीस पदक महाराष्ट्र दिनी जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राज्यातील 799 पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना ही पदके जाहिर केली आहेत. यात जिल्हा पोलीस दलात काम करणार्‍या सहा पोलिसांचा समावेश आहे.

सेवेत सतत 15 वर्षे उत्तम सेवाभिलेख केल्याबद्दल सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद अर्जुन चिंचकर, राज्य गुप्त वार्ता विभागाचे पोलीस हवालदार कृष्णा बबनराव विधाटे, पोलीस हवालदार विश्‍वास अर्जुन बेरड, पोलीस नाईक शरद मारूती बुधवंत, देवेंद्र दिलीप शेलार, तसेच राष्ट्रीय स्तरावरील खेळात प्राविण्य दाखविल्याबद्दल पोलीस शिपाई गणेश कलगोंडा पाटील यांना हे पदक जाहिर झाले आहेत.

जिल्ह्याचे भूमिपुत्र पाथर्डी तालुक्यातील सुपुत्र पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांना नक्षलवाद्यांविरुद्ध केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. गडचिरोली सारख्या नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आशा जिल्ह्यामध्ये त्यांनी नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले. अल्पावधीतच त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com