‘माध्यमिक’ च्या ऑनलाईन प्रणालीच्या कामाची चौकशी करा

परिवर्तन मंडळाच्या विरोधी संचालकांचे जिल्हा उपनिबंधकांना स्मरणपत्र
‘माध्यमिक’ च्या ऑनलाईन प्रणालीच्या कामाची चौकशी करा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तीन वेळा निवेदन देऊन व पाठपुरावा करुन देखील जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या ऑनलाईन प्रणालीच्या कामाची चौकशी होत नसल्याने, परिवर्तन मंडळाच्यावतीने विरोधी संचालकांनी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांना स्मरणपत्र दिले.

2016 पासून संस्थेच्या सर्व शाखांचे ऑनलाईन प्रणालीचे कामकाज अद्यापही अपूर्ण असून दोन महिन्यांपूर्वी पारनेर शाखेतील डाटा सेंटरच्या नावाखाली देण्यात आलेल्या ऑनलाईनच्या कामामुळे पूर्वी झालेले काम अपूर्णच असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी विरोधी संचालक बाबासाहेब बोडखे, आप्पासाहेब शिंदे, महेंद्र हिंगे, वसंत खेडकर, सभासद बबन शिंदे, जालिंदर शेळके उपस्थित होते.

30 मार्च, 30 नोव्हेंबर व 2 डिसेंबर 2021 रोजी परिवर्तन मंडळाच्यावतीने तीन वेळेस माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या ऑनलाईन प्रणालीच्या कामाची चौकशी होण्याबाबत निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात आला होता. दोन वेळेस जिल्हा उपनिबंधकांना प्रत्यक्ष भेटून याप्रकरणी सविस्तर माहिती दिली होती. परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही स्वरुपाची कारवाई करण्यात आलेली नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करून सुध्दा संस्थेचे ऑनलाईनचे काम अपूर्ण असून, ही सभासदांची व संस्थेची फसवणूक असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com