जिल्ह्यात वादळासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस

राहुरी कृषी विद्यापीठाचा पुढील पाच दिवसांचा अंदाज
जिल्ह्यात वादळासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस
File Photo

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

नगर जिल्ह्यात पुढील पाच दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचे संकेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिले आहेत. नगर जिल्ह्याकरिता पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज विद्यापीठाने वर्तविला आहे.

हवामान अंदाजात विद्यापीठाने म्हटले, पुढील पाच दिवस आकाश काही ठिकाणी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दि. 15 ते 16 मे रोजी जोराचे वारे व विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका तर दि. 17 ते 18 मे रोजी जोराचे वारे व विजेच्या कडकडाटांसह काही ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विद्यापीठाचा कृषी सल्ला

- पावसाची शक्यता असल्याने, कापणी केलेली पिके शेडमध्ये किंवा प्लास्टिकच्या कागदाने झाकून ठेवावीत.

- पिकाची काढणी शक्यतो सकाळच्या वेळेतच करावी व पावसापूर्वी करून घ्यावी.

- वादळी वार्‍याची शक्यता असल्याने, फळ पिकाचे संरक्षण करण्यासाठी बांबू किंवा लाकडी काड्यांचा आधार देऊन प्लॅस्टिक दोरीच्या सहाय्याने झाडे एकमेकांना बांधून घ्यावीत.

- पावसाच्या शक्यतेमुळे, विद्युत उपकरणाचा संपर्क टाळा. जनावरांना उघड्यावर चरावयास पाठवू नये, तसेच त्यांच्याकडे बारकाईने लक्ष द्यावे. झाडाखाली बांधू नयेत. जनावरे गोठ्यात बांधावीत आणि चारा उपलब्ध करून द्यावा.

- शेडमध्ये पाणी साचू नये, याची काळजी घ्यावी. जर पाणी साठलेल्या कोरड्या चार्‍यावर पडले आणि बुरशीचे आक्रमण आढळले तर तो चारा जनावरांना देऊ नये.

- शेतातील कामे शक्यतो टाळावीत.

- हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला व हवामानचा पूर्वानुमानाकरीता मेघदुत मोबाईल अ‍ॅपचा वापर करावा. विजेच्या अंदाजाचा पूर्वानुमानाकरीता दामिनी मोबाईल अ‍ॅपचा वापर करावा.असा सल्ला ग्रामीण कृषी मौसम सेवा, कृषी विद्या विभाग, मफुकृवि, राहुरी यांच्याव्दारे शेतकर्‍यांकरीता प्रसारित करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com