जिल्ह्यात पावसाची धुव्वाधार बॅटींग

53 महसूल मंडलांत दमदार पाऊस || खरिपांच्या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता
जिल्ह्यात पावसाची धुव्वाधार बॅटींग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी ते गुरूवारी सकाळपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे खरीप हंगामातील पिके आता धोक्यात आली असून पावसाने विश्रांती न घेतल्यास त्याचा परीणाम पिकांवर होण्याची शक्यता असल्याने शेतकरी आता जादाच्या पावसाने धास्तावला आहे. दरम्यान, खरीप हंगामातील पिके आता शेवटच्या टप्प्यात असून पावसाने आता उघडीप द्यावी, अशी शेतकर्‍यांची इच्छा आहे.

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत 448 मिली मीटर पाऊस होत असतो. यंदा 9 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात 447 मिली मीटर पाऊस प्रत्यक्षात झालेला असून त्याची सरासरी ही 99. 9 टक्के असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. साधारणपणे जिल्ह्यात महिनाअखेरपर्यंत पाऊस कोसळणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज असल्याने त्याचा पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पाऊस लांबल्यास त्याचा परिणाम खरीप हंगामातील ज्वारी पिकांच्या पेरणीवर होण्याची शक्यता आहे.

बुधवारी सायंकाळी ते गुरूवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत. यात सर्वाधिक पाऊस हा भिंगार महसूल मंडळ आणि पारनेर तालुक्यातील भाळवणीमध्ये 88, शेवगाव तालुक्यातील बोधेगाव 86 आणि भातकुडगाव 82, वाडेगव्हाण (पारनेर) 71, राशिन (कर्जत) 71 आणि पळशी (पारनेर) 62 मिली मीटर पावसाची नोंद झालेली आहे.

तालुकानिहा मंडलनिहाय पावसात नगर तालुक्यात नालेगाव 47.8, सावेडी 47.5, कापूरवाडी 40, केडगाव 88, भिंगार 40, नागापूर 32, जेऊर 29, चिचोंडी 22. पारनेर 41, भाळवणी 88, सुपा 48, वाडेगव्हाण 71, वडझीरे 57, निघोज 34, पळशी 62. श्रीगाेंंदा 30.8, काष्टी 57, बेलवंडी 38, पेडगाव 30, चिंभळा 36, देवदैठाण 59, कोळगाव 22. कर्जत-राशिन 66, भांबोरा 34, मिरजगाव 20. शेवगाव 76, भातकुडगाव 82, बोधेगाव 86, चापडगाव 86, ढोरजळगाव 31. पाथर्डी 45, माणिक दौंडी 45, टाकळी मानूर 47, कोरडगाव 47, करंजी 38. नेवासा - चांदा 40, घोडेगाव 47. राहुरी- ताहाराबाद 34, वांबोरी 32. संगमनेर- आश्वी 24, शिबलापूर 22, घारगाव 47, डोळसाने 47, साकूर 38, पिंपळणे 24. अकोले-वीरगाव 22, साकीरवाडी 20, राजूर 22, शेंडी 22, कोतूळ 22, ब्राम्हणवाडा 30 असे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com