जिल्ह्याच्या विविध भागात दुसर्‍या दिवशीही पाऊस

जिल्ह्याच्या विविध भागात दुसर्‍या दिवशीही पाऊस

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने (rain) पुन्हा एकदा जोरदार बरसायला सुरुवात केली आहे. काल शुक्रवारी सलग दुसर्‍या दिवशी नगर जिल्ह्यात (Ahmednagar District) अनेक ठिकाणी पाऊस सुरू होता. या पावसामुळे पिकांना जीवदान (Crop life) मिळाले आहे.

श्रीरामपूर शहर (Shrirampur) व परिसरात कालही सायंकाळी पाच ते साडेसहा वाजेपर्यंत तासभर मुसळधार पाऊस झाला. त्यानंतरही रात्री 10 वाजेपर्यंत अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. गोंडेगावात (Gondegav) चिंचेच्या झाडावर वीज कोसळली. त्यात या झाडाला बांधलेली कालवड मृत झाली. शिर्डीत (Shirdi) सायंकाळी पाच वाजेपासून संततधार सुरू होती. नगर (Nagar), राहुरी (Rahuri), कर्जत (Karjat), कोपरगाव (Kopargav), राहाता (Rahata) तालुक्यात पाऊस झाला. पावसाने मोठा खंड दिल्याने पिके कोमेजू लागली होती. त्यामुळे शेतकरी चिंतेत होता. तसेच पावसाचा पत्ता नसल्याने पेरण्या रखडल्या होत्या. आता पाऊस पडता झाल्याने या पिकांना आता जीवदान मिळाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com