राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष - पोलीस अधिकार्‍यांमध्ये जोरदार खडाजंगी

राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष - पोलीस अधिकार्‍यांमध्ये जोरदार खडाजंगी

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

मास्क न लावता आपल्या मोटारसायकलवरून रस्त्याने जात असताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार (District President of NCP Youth Congress Kapil Pawar) यांना महिला पोलीस अधिकार्‍याने (Women Police Officer) जाब विचारला. यामुळे संतप्त झालेल्या कपिल पवार व सदर महिला पोलीस अधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगी उडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास संगमनेर बस स्थानकासमोर घडली. दोघांमध्ये बराच वेळ सुरू असलेला वाद (disput) ऐकण्यासाठी नागरिकांनी गर्दी (Crowd) केली होती.

संगमनेर (Sangmner) तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने महसूल व पोलीस यंत्रणा सतर्क (Revenue and police alert) झाली आहे. करोना नियमाचे पालन (Follow the Corona rule) न करणार्‍या व्यापारी व नागरिकांच्या विरुद्ध पोलिसांनी धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. मास्क न लावता फिरणार्‍या विरुद्ध पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. संगमनेर बस स्थानकाच्या परिसरात मास्क (Mask) न घालणार्‍या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. काल सायंकाळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार हे आपल्या दुचाकीवरून जात होते. यावेळी बस स्थानका समोरील महामार्गावर बंदोबस्तास असलेल्या महिला पोलीस अधिकार्‍यांनी पवार यांना अडविले. मास्क न लावल्याने त्यांनी पवार यांना जाब विचारला. आणि दंड भरण्यास सांगितले.

यामुळे श्री. पवार चांगले संतापले. दोघांची जोरदार शाब्दिक बाचाबाची यावेळी झाली. बाचाबाचीचे रूपांतर अरेरावी पर्यंत गेले. हा वाद बराच वेळ सुरू होता. यामुळे बघ्यांनी गर्दी केली होती. संगमनेर बस स्थानक (Sangmner Bus Stand) परिसरात सुरू असलेल्या भांडणाची माहिती समजताच पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख हे घटनास्थळी आले. त्यांनी पवार यांना समजावून सांगितले आणि ते निघून गेले. यानंतरही हा वाद बराच वेळ सुरू होता. मास्क न घातल्याने दोनशे रुपये दंड भरा असे पोलिस अधिकार्‍यांनी पवार यांना सांगितले.

श्री पवार यांनी नंतर वरिष्ठ अधिकार्‍यांना फोनवरून तक्रार केली. मात्र याचा उपयोग झाला नाही. संगमनेरातील वरिष्ठ अधिकार्‍यांना त्यांनी फोन केला असता या अधिकार्‍याने सदर महिला पोलिस अधिकारी सोबत चर्चा केली. पवार यांनी मास्क न घातल्याने आपण त्यांना अडविल्याचे या अधिकार्‍याने सांगितले. पवार यांच्यावर कारवाई करा असे वरिष्ठ अधिकार्‍यांनी संबंधित महिला अधिकार्‍यास सांगितले. यानंतर पवार यांनी 200 रुपयांचा दंड भरला.

श्रीरामपूर, नगर, मुंबई पर्यंत वरिष्ठ राजकीय पदाधिकारी व पोलिस अधिकारी यांना फोनाफोनी सुरू होती. या वादाबाबत पवार काय भूमिका घेणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com