जिल्हा पोलीस दलाच्या 'या' शाखेतही करोनाचा शिरकाव
सार्वमत

जिल्हा पोलीस दलाच्या 'या' शाखेतही करोनाचा शिरकाव

13 कर्मचारी बाधित

Sachin Daspute

Sachin Daspute

अहमदनगर।प्रतिनिधी।Ahmednagar

जिल्हा पोलीस दलात करोना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) 13 पोलिसांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यांच्यावर पारनेर येथील कोवीड सेंटरमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

गुन्हेगारांना अटक करण्यासाठी जिल्ह्यासह बाहेरच्या जिल्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना जावे लागते. जिल्ह्यातील अवैध धंद्यावर छापे टाकण्यासाठी या कर्मचार्‍यांचा जिल्हाभर वावर असतो. यामुळे गुन्हे शाखेच्या 13 पोलीस कर्मचार्‍यांना लागण झाली आहे.

त्रास होऊ लागल्याने गुरूवारी व शुक्रवारी या कर्मचार्‍यांची तपासणी करण्यात आली होती. या तपासणी दरम्यान त्यांना करोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. पोलीस दलात एका पोलीस अधिकार्‍याचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, पोलीस मुख्यालय, शहर पोलीस दल, शीघ्र कृती दलातही करोनाने शिरकाव केला आहे.

या पाठोपाठ आता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनाही करोना संक्रमण झाले आहे. जिल्हा पोलीस दलात करोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने पोलीस दलासाठी ही चिंतेची बाब आहे.

Deshdoot
www.deshdoot.com