कांदा ग्राहकांना रडवणार, दर 4100 रुपयांवर

कांदा ग्राहकांना रडवणार, दर 4100 रुपयांवर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्याच्या विविध भागात धो-धो पावसामुळे प्रचंड नुकसान झाल्याने कांद्याच्या भावात तेजी (Onion prices rise) आली असून कांद्याचे दर (Onion Price) 4000 ते 4500 रुपये प्रति क्विंटलवर गेले आहे. या तेजीमुळे शेतकर्‍यांना हा कांदा हसवणार असला तरी ग्राहकांना रडवणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

राहुरीत (Rahuri) उन्हाळ कांद्याला (Onion) काल मंगळवारी 500 ते 3500 रुपये प्रति क्विंटल, कोपरगावात (Kopargav) 600 ते 3700 रुपये, तर राहात्यात (Rahata) सर्वाधिक 400 ते 4100 रुपयांचा दर मिळाला. श्रीरामपुरात (Shrirampur) सोमवारी 600 ते 4000 रुपयांचा भाव मिळाला होता. राज्याच्या विविध भागात कांद्याचे दर वाढले आहेत सोलापुरात (Solapur) तर लाल कांद्याची आवक (Onion Inward) झाली. 1 नं.च्या कांद्याला तब्बल 4500 रूपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. कांद्याच्या भावात तेजी आल्याने कांदा उत्पादक सुखावला आहे. पण गृहिणींचे बजेट कोसळणार आहे.

टाकळीभान (Takalibhan) वार्ताहराने कळविले की, श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Shrirampur Agricultural Produce Market Committee) टाकळीभान उपबाजारात कांदा चांगलाच वधारला आहे. काल मंगळवारी 1 नंबर कांद्याला 3900 रुपयाचा दर मिळाला. काल झालेल्या लिलाव बाजारसाठी 1 हजार 879 कांदा गोण्यांची आवक झाली होती. यावेळी एक नंबरच्या कांद्याला 3 हजार 200 ते 3 हजार 900 रुपये, दोन नंबरला 2 हजार 600 ते 3 हजार 200 रुपये, तीन नंबरला 500 ते 1 हजार 500 रुपये तर गोल्टी कांद्याला 2 हजार ते 2 हजार 700 रुपयाचा दर मिळाला.

कांदा भाव वाढल्याने शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर समाधान दिसुन येत होते. करोनाच्या संकटामुळे शासकिय नियमांचे पालन करीत लिलाव प्रक्रिया होत आहे. परीसरातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांना इतर कांदा बाजारच्या तुलनात्मक रास्त दर मिळत आसल्याने आपला कांदा विक्रिसाठी अणावा असे आवाहन सभापती संगिता शिंदे, उपसभापती नितिन भागडे, संचालक नानासाहेब पवार, विद्याताई दाभाडे, सचिव किशोर काळे, उपबाजार व्यवस्थापक दिनकर पवार यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.