आमदारांना आणखी 50 लाखांचा निधी

आमदारांना आणखी 50 लाखांचा निधी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आमदार स्थानिक विकास कार्यक्रम (MLA Local Development Program) सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी आता 353 विधिमंडळ सदस्यांना प्रत्येकी 50 लाख रुपये याप्रमाणे 176.50 कोटी रुपयांचा निधी (Fund) वितरीत करण्यात येत आहे. याबाबतचे परिपत्रक जारी (Circular issued) करण्यात आले आहे.

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सन 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी 1101 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीपैकी 35 टक्के निधी वितरीत करण्यास वित्त विभागाने सहमती (Consented by the Department of Finance) दर्शविली आहे त्यानुसार प्रत्येकी विधिमंडळ सदस्यांना प्रत्येकी 1 कोटी रुपये याप्रमाणे 353 विधिमंडळ सदस्यांना 353 कोटी रूपयांचा निधी यापूर्वीच वितरीत करण्यात आलेला आहे. आता 353 विधीमंडळ सदस्यांना प्रत्येकी 50 लाख रूपये याप्रमाणे 176.50 कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यात येत आहे. (Funds are being distributed.) हा निधी जिल्हाधिकार्‍यांकडे अधिनिस्त ठेवण्यात येत आहे.

नगर जिल्ह्याला 7 कोटी

अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड असे नगर जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. तसेच दोन विधानपरिषद सदस्य आहेत. या सर्वांना प्रत्येकी 50 लाख रूपये प्रमाणे 7 कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे.

यांना मिळणार निधी- ना. बाळासाहेब थोरात, आ. राधाकृष्ण विखे पा., ना. शंकरराव गडाख, ना.प्राजक्त तनपुरे, आ. आशुतोष काळे, आ. लहू कानडे, आ.रोहित पवार, डॉ. किरण लहामटे, आ. मोनिका राजळे, आ. संग्राम जगताप, आ. बबनराव पाचपुते, आ. निलेश लंके, विधानपरिषदेचे आ. डॉ. सुधीर तांबे, आ.अरूणकाका जगताप.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com