जिल्ह्यासाठी 14 कोटींचा आमदार निधी उपलब्ध

जिल्ह्यासाठी 14 कोटींचा आमदार निधी उपलब्ध

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सन 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी 1101 कोटी एवढी तरतूद करण्यात आली आहे. यापैकी 35 टक्के निधी वितरीत करण्यास वित्त विभागाने सहमती गदिली आहे त्यानुसार प्रती विधीमंडळ सदस्य 1 कोटी याप्रमाणे 340 विधीमंडळ सदस्यांचा 340 कोटी एवढा निधी जिल्हाधिकार्‍यांकडे अधिनस्त करण्यात येत आहे यात नगर जिल्ह्यात 14 आमदार असून प्रत्येकी 1 कोटी प्रमाणे 14 कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे.

ना. बाळासाहेब थोरात, माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ना. शंकरराव गडाख, ना. प्रसाद तनपुरे, आ. रोहित पवार, आ. आशुतोष काळे, आ. लहू कानडे, आ. बबनराव पाचपुते, संग्राम जगताप, आ. मोनिका राजळे, निलेश लंके, डॉ. किरण लहामटे, तसेच आ. डॉ. सुधीर तांबे, आ. अरूण जगताप यांना प्रत्येकी 1 कोटी असे 14 कोटींचा निधी नगर जिल्ह्याला मिळणार आहे.

हाही आमदार निधी करोना रोखण्यासाठी द्यावा

प्रत्येक आमदारांचा 1 कोटीचा निधी करोना रोखण्यासाठी देण्यात आला आहे. आता सरकारने स्थानिक विकास कामांसाठी आता 1 कोटी रूपये दिले आहेत. सध्या करोनाने सर्व जनता हैराण आहे. जिल्हयात सध्या ऑक्सीजन मिळत नाही..बेड मिळत नाहीत. किटमुळे चाचण्या कमी होत आहेत.. रेडमेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत असे विदारक वास्तव आहे. सध्या विकास कामांऐवजी करोना रूग्णांना वाचविणे महत्वाचे आहे. अशावेळी सर्व आमदारांनी हाही निधी करोना रोखण्यासाठी शिफारस करावी व जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com