file photo
file photo
सार्वमत

जिल्ह्यातील मंत्री व सत्ताधारी खासदारांचे शेतकरी प्रश्नाकडे दुर्लक्ष - जालिंदर निर्मळ

Arvind Arkhade

पिंपरी निर्मळ|वार्ताहर| Pimpari Nirmal

आढावा बैठकी पुरते जिल्ह्यात येणार्‍या गैरहजर पालकमंत्र्यांनी तरी या शेतकर्‍यांच्या डाळींब, दुबार सोयाबीन पेरणी, दुध दरवाढ, खते टंचाई या प्रश्नामध्ये लक्ष घालावे अशी मागणी गणेशचे संचालक जालिंदर निर्मळ यांनी केली आहे.

आर्द्रता युक्त व दमट हवामानामुळे फळबांगावर तेल्या रोगाचा प्रार्दुभाव झाल्याने फळगळ होवुन मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांमधुन याचे पंचनामे होवुन मदतीची मागणी होत आहे. मात्र शेतकर्‍यांचे नाव घेवुन शेतकर्‍यांच्या हितासाठी एकत्र येवुन सरकार चालविणार्‍यां आघाडी सरकारमधील जिल्हयातील मंत्र्यांकड्डन तसेच सत्ताधारी खासदाराकडुन याबाबत सोयीस्कर डोळेझाक होतांना दिसत आहे.

सोयाबीनचे बोगस बियाणे, दुधाची भाववाढ, खते टंचाई आदी प्रश्नामध्ये लक्ष घालण्यासाठी जिल्हयातील मंत्री व राज्यातील सत्ताधारी खासदारांना वेळ नसला तरी पालकमंत्र्यांनी तरी याबाबीमध्ये लक्ष घालुन प्रशासनास पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत व करोना संकटाबरोबरच नैसर्गीक संकटातही सापडलेल्या शेतकर्‍यांना मदत करावी, अशी मागणी गणेशचे संचालक जांलिदर निर्मळ यांनी केली आहे.

आ.राधाकृष्ण विखेच्या भुमीकेचे स्वागत

राज्याचे माजी कृषी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकर्‍यांवर ओढावलेल्या नैसर्गीक संकटाबाबतची माहीती शेतकरी, कृषी विभाग तसेच कृषी विज्ञान केद्रांचे अधिकारी यांचेकडुन घेवुन राज्य सरकारकडे पंचनामे करून शेतकर्‍यांना मदतीसाठी पाठपुरावा सुरू केल्यामुळे शेतकर्‍यांमधुन समाधान व्यक्त होत आहे.

राज्यामध्ये आघाडी सरकार मध्ये सत्तेत असलेले जिल्हयातील मंत्री ना .बाळासाहेब थोरात, ना. तनपुरे तसेच शिवसेनेचे सत्ताधारी खा. सदाशिव लोखंडे यांनी करोना धक्क्यातुन बाहेर येवुन डाळींब शेतकर्‍यांचे झालेल्या नुकसानीची स्वतः पहाणी करावी व शेतकर्‍यांना दिलासा द्यावा.

- जालिंदर निर्मळ संचालक, श्रीगणेश सह. साखर कारखाना.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com