दूध दरावाढीसाठी ठिकठिकाणी आंदोलने
सार्वमत

दूध दरावाढीसाठी ठिकठिकाणी आंदोलने

Arvind Arkhade

दूध दरावाढीसाठी ठिकठिकाणी आंदोलने

संगमनेर|प्रतिनिधी|Sangmner

युती सरकारने नाईलाजाने दूध उत्पादकांना 5 रुपयांचे अनुदान दिल्याचे सांगितले जात असेल तर महाविकास आघाडी सरकारने ईलाज म्हणून का होईना 10 रुपयांचे अनुदान देवून दाखवावे. राज्यातील दूध संघ हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्यामुळेच शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत असल्याचा आरोप शेतकरी नेते संतोष रोहोम यांनी केला.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोल्हार- घोटी मार्गावर दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी तालुका अध्यक्ष डॉ. अशोक इथापे, जनसेवा मंडळाचे अध्यक्ष भास्करराव दिघे, डॉ. विखे पाटील कारखान्याचे संचालक रामभाऊ भूसाळ, डॉ. सोमनाथ कानवडे, रासपचे नेते नामदेव काशिद, जि.प. सदस्या अ‍ॅड. रोहिणीताई निघुते, राजेश चौधरी, डॉ. विखे पाटील कृषि परिषदेचे जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे, शहर अध्यक्ष राजेंद्र सांगळे, राम जाजू, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. श्रीराज डेरे, योगीरजसिंग परदेशी, परिमल देशपांडे, वैभव लांडगे, विठ्ठलराव शिंदे, आदि सहभागी झाले होते. दूध उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन तहसिलदार अमोल निकम यांना देण्यात आले.

भाजपाचे तालुका अध्यक्ष अशोक इथापे म्हणाले की, शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी भाजपाने राज्यभर आंदोलन सुरु केले आहे. कोरोना संकटाच्या काळात शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. दूध धंद्यामुळे असणारी स्थिरता आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे अस्थिर होत असल्याची टिका त्यांनी केली.

याप्रसंगी डॉ. सोमनाथ कानवडे, भास्करराव दिघे, रासपचे नामदेव काशिद, डॉ.अरुण इथापे, यांची भाषणे झाली. या आंदोलनात बुवाजी खेमनर, रभाजी इलग, रविंद्र गाढे, सुनिल शेरमाळे, दादासाहेब नेहे, संजय नाकील, संदिप गुंजाळ, दिलीप कडलग, बबन आंधळे, श्रीरंग तांबे, दिपक भगत आदिंसह महिला व दुध उत्पादक शेतकरी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

कोल्हार भगवतीपूर येथे दूध दरवाढ आंदोलन

कोल्हार|वार्ताहर|Kolhar

दुधाला 30 रुपये प्रति लिटर भाव मिळावा या मागणीसाठी कोल्हार भगवतीपूर येथे शेतकर्‍यांनी तसेच भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी नगर-मनमाड महामार्गावर दूध ओतून आंदोलन केले. यावेळी महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी माजी जि. प.सदस्य डॉ. भास्करराव खर्डे म्हणाले, नगर जिल्ह्यामध्ये पुर्वी श्वेतक्रांती बहरली होती. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. महाविकास आघाडी सरकारने दुधाला 25 रुपये हमीभाव ठरविला होता. यावर मंत्रिमंडळाच्या दोन बैठका झाल्या. तरीही अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही. तोडगा निघाला नाही. याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. तसेच दुधाला 30 रुपये प्रति लिटर भाव मिळावा अशी मागणी त्यांनी केली.

याप्रसंगी जि. प. सदस्य डॉ. भास्करराव खर्डे, देवालय ट्रस्टचे उपाध्यक्ष सयाजी खर्डे, अशोकलाल आसावा, भगवतीपुरचे सरपंच रावसाहेब खर्डे, कोल्हार बुद्रुकचे उपसरपंच ज्ञानेश्वर खर्डे, पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे संचालक स्वप्निल निबे, धनंजय दळे, दत्तात्रय खर्डे, भास्करराव दिगंबर खर्डे, अमोल थेटे, पंढरीनाथ खर्डे, श्रीकांत खर्डे, कैलास दळे आदी उपस्थित होते.

राहुरीत भाजपाने ओतले रस्तावर दूध

राहुरी|तालुका प्रतिनिधी|Rahuri

राहुरी, नगर, पाथर्डी मतदारसंघाचे माजी आमदार भाजपा नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर भाजपा व मित्रपक्षांच्या वतीने एल्गार आंदोलन करण्यात आले.

यावेळी दूध उत्पादकांनी रस्त्यावर दूध ओतून महा विकास आघाडी शासनाचा निषेध केला. माजी आमदार कर्डिले म्हणाले, पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत व दुधाला दर 18 रुपये प्रतिलिटर मिळत आहे.

मागील पाच वर्षात कधी शेतकर्‍यांना खतासाठी रांगेत उभे राहावे लागले नाही. परंतु या सरकारच्या काळात खते मिळणेही शेतकर्‍यांना अवघड झाले आहे. परंतु सरकारचे याकडे लक्ष नाही. शासनाने दुधाला 30 रुपये भाव देऊन दूध भुकटी निर्यातीस 50 रुपये प्रतिकिलो अनुदान द्यावे तसेच दूध उत्पादकांच्या खात्यावर प्रतिलिटर दहा रुपये प्रमाणे पैसे जमा करावे, अन्यथा या शासनाविरोधात आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.

यावेळी अनेक शेतकर्‍यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आंदोलनात राहुरी तालुका भाजपाचे अध्यक्ष अमोल भनगडे, सुभाष गायकवाड, संदीप गिते, राजेंद्र गोपाळे, डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक सुरसिंग पवार, रवींद्र म्हसे, उत्तम म्हसे, योगेश देशमुख, शहाजी जाधव, बबन कोळसे, सतीश पवार, अरूण साळवे, आदींसह भाजपा मित्रपक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. नायब तहसीलदार गणेश तळेकर व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना आंदोलकांतर्फे निवेदन देण्यात आले.

राज्य सरकारने दूधाला 35 रुपये भाव द्यावा- पिचड

अकोले|प्रतिनिधी|Akole

शेती मालाला हमी भाव नाही, रोजगार हमीची कामे बंद आहेत. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांच्या उदरनिर्वाहाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. राज्य सरकारने शेतकर्‍यांना वार्‍यावर न सोडता दुधाला 35 रुपये भाव तातडीने द्यावा, अशी मागणी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केली.

दुधाला हमीभाव मिळावा, लिटर मागे 10 रुपये अनुदान मिळावे, दूध भूकटीला किलो मागे 50 रुपये अनुदान मिळावे या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या सरकारच्या विरोधात भाजपच्या वतीने माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली अकोले शहरातील सिद्धेश्वर दूध डेअरी समोर महाएल्गार आंदोलन करण्यात आले.

त्यावेळी ते बोलत होते. माजी आमदार वैभवराव पिचड, जिल्हा बँकेचे चेअरमन सीताराम पा.गायकर, शेतकरी नेते मधुकरराव नवले, भाजप तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, बाळासाहेब ताजणे, सिद्धेश्वरचे चेअरमन संदीप शेटे, नगराध्यक्षा संगीताताई शेटे आदी उपस्थित होते.

राज्यसरकार दुधउत्पादक शेतकर्‍यांचा विरोधात षडयंत्र रचत असल्याचा आरोप राज्याचे शेतकरी नेते मधुकरराव नवले यांनी केला आहे.

गणोरे येथे माजी आमदार वैभवराव पिचड, जि.प.गटनेते जालिंदर वाकचौरे, खडकी येथे सभापती उर्मिला राऊत, विरगाव येथे अमृतसागर दूध संघाचे व्हा.चेअरमन रावसाहेब वाकचौरे, मनोहरपूर व लिंगदेव येथे भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, विठ्ठल कानवडे, अंबड येथे गिरजाजी जाधव, कळस येथे भाजप सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, आर.पी.आय जिल्हाउपाध्यक्ष राजेंद्र गवांदे, अंभोळ येथे अमृतसागर दूध संघाचे संचालक शरद चौधरी, जनलक्ष्मी दूध डेअरी समोर भाउपाटील नवले, धुमाळवाडी येथे प्रवीण धुमाळ, पैठण येथे विठ्ठल डुंबरे, रुंभोडी येथे गोरख मालुंजकर, राजूर येथे उपसभापती दत्ता देशमुख, राजेंद्र लहामगे, कोतुळ येथे गणेश पोखरकर, निंब्रळ येथे यशवंत आभाळे, राजेंद्र डावरे, देवठाण येथे अरुण शेळके, केशव बोडके, पिंपळगाव निपाणी येथे सुभाष वाकचौरे, हिवरगाव आंबरे येथे अंजनाताई बोंबले, माधव ठुबे लहीत येथे रेश्मा गोडसे, उंचखडक येथे राहुल देशमुख, महिपाल देशमुख, केळी येथे तुषार बोर्‍हाडे शेंडी विजय भांगरे, वारघुशी भरत घाणे, अलका अवसरकर, खानापूर येथे श्रीकांत भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली दूध आंदोलन केले. अकोले येथील आंदोलनात अनिल गायकवाड, रामनाथ मंडलीक, रमेश राक्षे, बाळासाहेब वडजे, विक्रम नवले, राजेंद्र गोडसे, सुनील कोटकर, रामदास आंबरे, विजय सारडा, दत्तू गायकवाड, सोनाली नाईकवाडी, प्रकाश नाईकवाडी, राजेंद्र गोडसे, शंभू नेहे, अविनाश शेटे, राजेंद्र गवांदे हे उपस्थित होते.

आश्वीतही दूध उत्पादक रस्त्यावर

आश्वी|वार्ताहर|Ashwi

भाजपच्या वतीने राज्यभरात दूध दरासबंधी आंदोलन सुरु असल्याने शिर्डी मतदार संघात राज्याचे माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एल्गार आंदोलन झाले. संगमनेर तालुक्यातील आश्वी पंचक्रोशीतील गावांनी या आंदोलनाला उदंड प्रतिसाद दिला.

या आंदोलनामध्ये प्रतापपूर येथे ज्येष्ठ कार्यकर्ते भगवानराव इलग, सुखदेव आंधळे, वच्छला बळीत, सुमनताई आंधळे, आश्वी खुर्द येथे प्रवरा बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब भवर, विखे पाटील कारखाण्याचे संचालक डॉ. दिनकर गायकवाड, सरपंच म्हाळू गायकवाड, उपसरपंच सुनिल मांढरे, कांचन मांढरे, मकरंद गुणे, माजी उपसरपंच संजय गायकवाड, डॉ. भानुदास आंधळे, बाळासाहेब मांढरे, प्रशांत कोडोलीकर, विजय गायकवाड, शिवाजी शिंदे, बाळासाहेब शिदें, तुकाराम गायकवाड, गमाजी गायकवाड, मनोली येथे मच्छिंद्र भागवत, बाबासाहेब ठोसर, लखन साबळे, संदीप बोंद्रे, पप्पू भवर, तुळशीराम कांडळकर, आश्वी बुद्रुक येथे माधवराव गायकवाड, मिलिंद बोरा, ज्ञानेश्वर वाकचौरे, ज्ञानदेव गायकवाड, विठ्ठल गायकवाड, नाना हळनोर, बाळासाहेब उगले, विजय वाकचौरे, शिबलापूर येथे माजी संचालक जेऊरभाई शेख, तब्बाजी मुन्तोडे, अण्णासाहेब म्हस्के, राजू नागरे, नारायण बोद्रें, शिवराम बोंद्रे, गंगाधर बोंद्रे, विजय मुन्तोडे, पानोडी येथे अशोक तळेकर, रावसाहेब घुगे, भाऊसाहेब चव्हाण, नानासाहेब शिंदे, पुजांजी नागरे, बाळासाहेब जाधव, राजु जाधव, बाळासाहेब कदम, गणेश कदम, मालुंजे येथे सरपंच संदीप घुगे, ज्ञानदेव सोसे, काशीनाथ सोसे, संदीप बुरुकुल, राजेंद्र आव्हाड, आमोल बुरुकुल, सुधीर डोंगंरे, हंगेवाडी येथे माजी पंचायत समिती सभापती अकुंशराव कांगणे, शिवाजी सांगळे, भाऊसाहेब सांगळे, अर्जुन सांगळे, विजय सांगळे, केशव घुगे, शेडगाव येथे पंचायत समिती सदस्य निवृत्ती सांगळे, सखाहरी नागरे, दिलीप नागरे, कैलास आंधळे, जनार्धन नागरे, लहानु नागरे, बाबासाहेब फड, झरेकाठी येथे गोकूळ वाणी, गोरख वाणी, मधूकर वाणी, पिप्रीं-लौकी आजमपूर येथे भारत गिते, रमेश गिते, सुरेश मुढें, गणपत गिते, विलास गिते, अशोक गिते, दाढ खुर्द विखे पाटील कारखान्याचे संचालक हभप शांताराम जोरी, आण्णा जोशी, नारायण कहार, अशोक जोशी, सतिष जोशी, सुनिल जोशी आदिसह स्थानिक दुध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तर उंबरी-बाळापूर, रहिमपूर, निमगावजाळी, चणेगाव, सादतपूर, चिचंपूर आदी ठिकाणी दूध उत्पादक शेतकर्‍यांचा रोष पहावयास मिळाला आहे.यावेळी आश्वीचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर व त्यांचे सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

दुधाचे भाव कमी करून सरकारने शेतकर्‍यांचे वाटोळे केले - आव्हाड

सोनेवाडी|वार्ताहर|Sonewadi

आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून दूध धंद्याची वाट लागली आहे. दुधाला पंधरा ते सोळा रुपये भाव मिळत असून जनावरांचा चारा, खाद्य अदि खर्चाचा हिशोब काढला तर शेतकर्‍याच्या हातात फुटकी कवडी देखील शिल्लक राहत नाही. दूध धंद्याहमुळेच केवळ दूध उत्पादक शेतकरी जिवंत होता मात्र दुधाचे भाव कोसळत असताना सरकारची बघ्याची भूमिका वेदनादायी आहे. आघाडी सरकारमुळेच शेतकर्‍यांचे वाटोळे झाले असल्याचे प्रतिपादन कोल्हे कारखान्याचे संचालक सुभाष आव्हाड यांनी केले.

कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे महाएल्गार आंदोलनात बोलत होते. जेऊर कुंभारी दूध उत्पादक संस्थेच्या वतीने दूध उत्पादकांनी आपले दुध घरी ठेवत हे आंदोलन केले. यावेळी संचालक शिवाजी वक्ते, बाळासाहेब वक्ते, विजय रोहम, सरपंच सविता दळवी, उपसरपंच यशवंत आव्हाड, भाऊसाहेब वक्ते, शिवाजी वक्ते, ज्ञानेश्वर वक्ते, सतीश आव्हाड, बबलू रोहम, ऋषिकेश आव्हाड, नाना मलगुंडे अदीसह शेतकरी व दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन उपसरपंच यशवंत आव्हाड यांनी केले तर आभार सरपंच सविता दळवी यांनी मानले.

दूध दरवाढीसाठी श्रीरामपूर भाजपाचे आंदोलन

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

सध्या करोनाच्या काळामध्ये शेतकरी व दूध उत्पादक यांना जीवन जगणे असाह्य झाले आहे. त्यातच महाराष्ट्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे दूध उत्पादक व शेतकरी अतिशय मेटाकुटीस आला आहे. यापार्श्वभूमीवर सरकारच्या आठमुठ्या भुमिकेस विरोध करण्यासाठी तसेच दूध दरवाढ मिळावी यामागणीसाठी श्रीरामपूर भाजपाच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

यावेळी श्रीरामपूर तालुक्यात भाजपाच्या वतीने 32 गावांमध्ये दूध दरवाढीसाठी निषेधाचे आंदोलन करण्यात आले. शहर व तालुक्यात बेलापूर, हरेगाव, खैरिनिमगाव, टाकळीभान गोंडेगाव पढेगाव, कारेगाव, गोंडेगाव, जाफ्राबाद आदी प्रमुख गावांसह 32 ठिकाणी सरकारचा निषेध करण्यात आला.

यावेळी श्रीरामपूरमधील भाजपचे गणेश राठी, मारूती बिंगले, युवा मोर्चाचे विशाल यादव, आनंद बुधेकर, ओंकार झिरंगे, रवी पंडीत, गणेश अभंग, सतिश सौदागर, विजय लांडे, रूपेश हरकल, तालुक्यात तालुकाध्यक्ष सुनील वाणी, राम तरस, संतोष हारगुडे, अनिल भनगडे, सुनील दिवटे, शैलेश खाटेकर, प्रफुल्ल डावरे, पुरूषोत्तम भराटे, कुंभकर्ण, विशाल खरात आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

Deshdoot
www.deshdoot.com