जिल्हास्तरीय मराठी भाषा समिती गठीत

शिंदे, डॉ.कळमकर, मरकड, नजन यांचा समावेश
जिल्हास्तरीय मराठी भाषा समिती गठीत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हास्तरीय मराठी भाषा समितीमध्ये (District Level Marathi Language Committee) अशासकीय सदस्य म्हणून ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे (Maharashtra Sahitya Parishad) शाखा कार्याध्यक्ष किशोर मरकड, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.शशिकांत शिंदे, नाट्यकलावंत व नाटय परिषदेचे सदस्य शशिकांत नजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर न करण्यासंदर्भात प्राप्त होणार्‍या तक्रारींची चौकशी करून निराकरण करण्यासाठी व मराठी भाषेच्या (Marathi languages) संदर्भातील उपक्रम राबवण्यासाठी अहमदनगर जिल्हास्तरीय मराठी भाषा समिती (Ahmednagar District Level Marathi Language Committee) जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले (Collector Rajendra Bhosale) यांनी गठीत केली आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आहेत.

सामान्य प्रशासनाचे तहसीलदार सचिव आहेत. शासकीय सदस्य म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषद माध्यमिक व प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे.

डॉ. संजय कळमकर यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. प्रभावी वक्ते व कथाकथनकार म्हणून ते महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. शशिकांत शिंदे हे प्रसिद्ध कवी असून सारडा महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा बजावतात किशोर मरकड 20 वर्षापासून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून या साहित्यक्षेत्रात सक्रिय आहेत. शशिकांत नजन हे अभिनेते असून नाटय चळवळीशी संबधीत आहेत.

Related Stories

No stories found.