जिल्ह्यात चक्रीवादळात 12 लाखांचे नुकसान

10 लाख 35 फळपिकांसाठी उर्वरित घर आणि गोठ्यांसाठी
जिल्ह्यात चक्रीवादळात 12 लाखांचे नुकसान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या चक्रीवादळात 11 लाख 69 हजार रुपयांचे नुकसान झालेले आहे. यात 56 हेक्टरवरील आंबा बागांचे तर उर्वरिमध्ये कच्ची आणि पक्की घरे, यासह जनावरांच्या गोठ्याचा समावेश आहे. याबाबत अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार करून तो भरपाईसाठी शासनाला सादर करण्यात येणार आहे.

यात जिल्ह्यात 76 शेतकर्‍यांचे 56 हेक्टरवर आंबा पिकांचे 33 टक्कांपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे. या नुकसान भरपाईपोटील जिल्हा प्रशासन शासनाकडे 10 लाख 35 हजारांची मागणी नोंदविणार आहे. तर जिल्ह्यात वादळात 9 कच्च्या घरांची पडझड झाली.

असून त्यांच्या दुरूस्तीसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे 45 हजार तर 7 पक्क्या घरांचे नुकसान झाले असून त्यांच्या दुरूस्तीसाठी 42 हजार असे 92 हजारांची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे. यासह अकोले तालुक्यातील वीरगाव येथे जनावरांचे दोन गोठे पडले असून त्यांच्या दुरूस्तीसाठी 42 हजारांची मागणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com