जिल्हा रुग्णालयाला 18 लाखांचे व्हेंटिलेटर

जिल्हाधिकारी डॉ. भोसले : कोविड काळात होगाणास कंपनीचे कार्य कौतुकास्पद
जिल्हा रुग्णालयाला 18 लाखांचे व्हेंटिलेटर
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनामुळे (Covid 19) नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण (atmosphere of fear) पसरले आहे. त्यांना आरोग्य सेवा व आधार (Health care and support) देण्याचे काम करणे गरजेचे आहे. या सामाजिक भावनेतून एमआयडीसी (MIDC) येथील होगाणास इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Hoganas India Pvt. Ltd.) कंपनीने वर्षभर करोना संकट काळामध्ये केलेले कार्य कौतुकास्पद आहे. कंपनीच्यावतीने तीन व्हेंटिलेटर जिल्हा प्रशासनाकडे (Three ventilators handed over to district administration) सुपूर्त केले आहेत. याचा उपयोग जिल्हाभरातील आरोग्य सेवेला नक्कीच तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले (Collector dr. Rajendra Bhosale) यांनी केले.

एमआयडीसी येथील होगाणास इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने जिल्हा रुग्णालयास (District Hospital) 18 लाख रुपयांची तीन व्हेंटिलेटर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्याकडे सुपूर्त केले. यावेळी कंपनीचे प्लांट हेड डॉ. शरद मगर, एचआरहेड सुभाष तोडकर, नवजीवन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पवार, डॉ.सोनाली बांगर, संतोष धुमाळ आदी उपस्थित होते. यावेळी मगर म्हणाले, करोना संकट काळामध्ये मानवतेच्या भावनेतून मदतीचा हात देण्याचे काम होगाणास कंपनीने केले आहे. कंपनीच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.

करोनाच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये (Lockdown) 48 हजार गरजुंना भोजनाची व्यवस्था केली होती. याचबरोबर चिचोंडी पाटील (Chichondi Patil) येथील आरोग्य केंद्रास 35 बेड उपलब्ध करून दिले. अनामप्रेम संस्थेलाही 35 बेडची मदत केली. बुर्‍हाणनगर येथील आरोग्य केंद्रास 25 हजारांच्या करोना प्रतिबंधक साहित्याचे वाटप करण्यात आले. दुसर्‍या लाटेतही यावर्षी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून रुग्णांना ऑक्सिजनची (oxygen) कमतरता भासू नये, यासाठी जामखेड येथील आरोळे हॉस्पिटलमध्ये 26 लाख रुपये खर्च करून ऑक्सिजन प्लांट निर्मिती केली आहे. नवजीवन प्रतिष्ठानचे राजेंद्र पवार यांनी सर्वांचे आभार मानले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com