सिव्हील हॉस्पिटलमध्ये चोरी करणारा जेरबंद

सिव्हील हॉस्पिटलमध्ये चोरी करणारा जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सिव्हील हॉस्पिटलमधील ऑपरेशन थिएटर उभारणीसाठी आणलेल्या 81 हजार रूपये किंमतीचे साहित्य चोरणार्‍या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लालटाकी परिसरात अटक केली.

लखन अनिल घोरपडे (वय 24 रा. भारस्कर कॉलनी, लालटाकी) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. त्याच्याकडून 10 हजार रूपये किंमतीचे पाईप जप्त करण्यात आले आहे. आरोपी घोरपडे विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. सिव्हील हॉस्पिटलमधील ऑपरेशन थिएटरचे काम सुरू आहे. या कामासाठी लागणारे साहित्य हॉस्पिटलमधील एका रूममध्ये ठेवले आहे.

चोरट्यांनी रूमचा दरवाजा तोडून आयसोलेशन व्हॉल्व्ह, कॉपर पाईप, एक्सप्शन व्हॉल्व असे 81 हजार रूपयांचे साहित्य चोरून नेल्याची फिर्याद तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल आहे. याप्रकरणी लखन अनिल घोरपडे व मुरलीधर विश्वनाथ पाखरे विरोधात गुन्हा दाखल आहे. पाखरे याला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे.

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी घोरपडे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संदीप घोडके, संदीप पवार, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, कमलेश पाथरूट यांच्या पथकाने ही कारवाई केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com