जिल्हा रुग्णालयासह नऊ प्रयोगशाळांना नोटिसा

मनपाचा इशारा : अन्यथा परवाना निलंबित करणार
जिल्हा रुग्णालयासह नऊ प्रयोगशाळांना नोटिसा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वेळोवेळी पाठपुरावा करूनही करोना चाचण्यांची माहिती सादर न केल्याने महापालिकेने जिल्हा रुग्णालयातील चाचणी केंद्रांसह शहरातील नऊ प्रयोगशाळांना नोटिसा बजावल्या आहेत. गेल्या वर्षभरातील महापालिकेची अशा स्वरूपातील पहिलीच कारवाई आहे. जिल्हा रुग्णालय, मोलेक्युलर, एजीडी, मेट्रो, सहयोग, हेल केअर, कृष्णा, सुयोग या प्रयोग शाळांना नोटीसा बजविण्यात आल्या आल्याची माहिती समोर आली आहे.

करोनाची लक्षणे असणार्‍यांची महापालिकेच्या सात आरोग्य केंद्रात चाचणी केली जाते. तसेच जिल्हा रुग्णालयातील चाचणी केंद्रात स्वॅब घेतले जात असून याशिवाय आठ खासगी प्रयोगशाळांमध्ये तपासणी केली जाते. महापालिकेच्या आरोग्य केंद्रात किती व्यक्तींचे स्वॅब घेतले, याची माहिती प्रशासनाला नियमित मिळते.

परंतु, जिल्हा रुग्णालयासह खासगी प्रयोगशाळांकडून दररोज स्वॅब घेतले जातात, त्यापैकी किती जणांचे अहवाल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आले, याची माहिती महापालिकेला दिली जात नाही. ही आकडेवारी उपलब्ध करून देण्याबाबत महापालिकेकडून वेळोवेळी पाठपुरवा केला गेला. परंतु, प्रयोगशाळांनी माहिती सादर केली नाही. त्यामुळे नगर शहरातील पॉझिटिव्ह रेट नेमका किती आहे, याची माहिती उपलब्ध होत नव्हती.

महापालिका आयुक्तांनी शहरातील डॉक्टर व प्रयोगशाळा चालकांची बैठक घेऊन याबाबत वेळोवेळी सूचनाही केल्या होत्या. मात्र खासगी प्रयोगशाळांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महापालिकेने जिल्हा रुग्णालयासह शहरातील नऊ खासगी प्रयोग शाळांना नियमित माहिती न मिळाल्यास परवाना निलंबित करण्यात येईल, अशा नोटिसा पाठविल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com