जिल्हा रुग्णालयाच्या मेन गेटला बॅरेकेट

पोलीस बंदोबस्तात जिल्हा रुग्णालयातील खासगी वाहनांना बाहेरचा रस्ता
जिल्हा रुग्णालयाच्या मेन गेटला बॅरेकेट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा रूग्णालयात करोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार घेणार्‍या नातेवाईकांची वाहने रूग्णालयाच्या आवारात पार्क करण्यात येतात. परंतु, जिल्हा शल्सचिकित्सकांना रूग्णालयाच्या आवारात वाहने पार्क केल्याचे वावडे होत आहे. त्यांनी पोलिसांना आदेश करत सर्व वाहने बाहेर काढण्याचे सांगितले. तोफखाना पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशाने मंगळवारी सायंकाळी सर्व वाहने बाहेर काढत मेन गेटला बॅरेकेट लावले आहेत.

जिल्हा रूग्णालयात सुमारे साडे चारशे ते पाचशे बेडचे सेंटर आहे. जिल्हाभरातून याठिकाणी करोना रूग्ण उपचार घेण्यासाठी येत आहे. रूग्णांना घेऊन येणारे नातेवाईक रूग्णालयाच्या आवारात आपले वाहने पार्क करत होती. त्या वाहनांमुळे रूग्णालय आवारात गर्दी होत आहे. यामुळे जिल्हा शल्सचिकित्सकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे यासंदर्भात तक्रार केली. वारंवार तक्रार केल्याने पोलीस अधीक्षकांनी याची दखल घेत रूग्णालय आवारातील सर्व वाहने बाहेर काढण्याच्या सूचना शहर पोलिसांना दिल्या. तोफखाना पोलिसांनी मंगळवारी कारवाई करत रूग्णालय आवारातील वाहने बाहेर काढत बॅरेकेट लावले आहेत.

रूग्णालयातील डॉक्टर, रूग्णावाहिकाच आत सोडण्यात येत आहे. दरम्यान, करोना रूग्णांना घेऊन येणारे नातेवाईक आपले वाहने रूग्णालयाच्या आवारात पार्क करून तेथेच आश्रम घेत होते. रूग्णांना घेऊन येणारे नातेवाईकांमध्येही काही व्यक्ती करोना पॉझिटिव्ह असल्याची शक्यता नाकारता येत नाही. नातेवाईक वाहने पार्क करून त्याच ठिकाणी थांबत होते. परंतू, रूग्णालय आवारात वाहने पार्क करण्यास बंधने आल्याने ते नातेवाईक रस्त्यावर येणार आहे. यामुळे शहरात करोना संसर्ग होण्याची भिती आहे. तसेच रूग्णांच्या नातेवाईकांनी आपले वाहने कुठे पार्क करावे हा प्रश्न आहे.

रूग्णालय आवारात नागरिक अस्तव्यस्त वाहने पार्क करत. आपत्कालीन परिस्थितीत या वाहनांची अडचण निर्माण होऊन शकते. काही नागरिक विनाकारण रूग्णालय आवारात गर्दी करत असतात. यामुळे ही वाहने बाहेर काढली आहेत.

- सुनील गायकवाड (पोलीस निरीक्षक, तोफखाना).

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com