करोनात काळातही शेतकर्‍यांना 1678 कोटींचा बुस्टर डोस

पीक कर्ज : सहकार मंत्र्यांच्या सुचनेनंतर व्यापारी अन् ग्रामीण बँकांचा पतपुरवठा वाढणार
करोनात काळातही शेतकर्‍यांना 1678 कोटींचा बुस्टर डोस

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात (District) करोनाच्या दुसर्‍या लाटेत शेतकर्‍यांची आर्थिक घडी विस्कटलेली असतांना जिल्हा बँकेसह (District Bank) व्यापारी आणि ग्रामीण बँका (Merchant and rural banks) शेतकर्‍यांच्या मदतीला धावून आल्या आहेत. यामुळे खरीप हंगामासाठी (kharif season) जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 1 हजार 678 कोटी 18 लाखांचे पीक कर्ज (Crops Loan) देण्यात आले आहे.

नुकतीच राज्याच्या सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Co-operation Minister Balasaheb Patil) यांनी शेतकर्‍यांना जास्तीजास्त पत उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या असून यामुळे व्यापारी आणि इतर ग्रामीण बँकांची पीक कर्जाची (Crops Loan) व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याचे अग्रणी बँकेच्यावतीने सांगण्यात आले.

दरवर्षी जिल्ह्यातील शेतीसाठी पतधोरण ठरवण्यात येते. जिल्ह्यात मार्चपासून करोनाच्या दुसर्‍या लाटेचा उद्रेक झाला. यामुळे पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आले. यामुळे आधीच शेतीमालाला भाव नसलेल्या शेतकर्‍यांसमोर आणखी अडचणी उभ्या राहिल्या. यातून मार्ग काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यंदाचे खरीप हंगामासाठी 3 हजार 753 कोटी रुपये पिक कर्ज देण्याचे नियोजन केले.

यापैकी 1 हजार 678 कोटी म्हणजेच 45 टक्के कर्जवाटप करण्यात आलेले आहे. यात सर्वात आघाडीवर जिल्हा बँक (District Bank) असून बँकेच्यावतीने 1 हजार 415 कोटी रुपयांचे कर्ज शेतकर्‍यांना वाटप (Allocation of loans to farmers) करण्यात आलेले आहे. यासह व्यापारी बँकांनी 260 कोटी तर ग्रामीण बँकेच्यावतीने अडीच कोटींचे कर्ज वाटप करण्यात आलेले आहे.

नुकतीच सहकार मंत्री पाटील यांनी राज्यातील बँकांना शेतकर्‍यांना पिक कर्जा वाटपाची मर्यादा वाढवण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानूसार नगर जिल्ह्यातील (Nagar District) सर्व बँकांची पिक कर्जाची आढावा बैठक (Crop loan Review Meeting) घेवून त्यात व्यापारी आणि इतर ग्रामीण बँकांचे कर्जवाटप वाढविण्यात येणार असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेच्यावतीने सांगण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com