दलित वस्तीसाठी 93 कोटी 27 लाख 56 हजारांची कामे मंजूर

दलित वस्तीसाठी 93 कोटी 27 लाख 56 हजारांची कामे मंजूर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील 14 तालुक्यांना अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यामध्ये विविध विकास कामांसाठी 93 कोटी 27 लाख 56 हजारांची प्रशासकिय मंजुरी देण्यात आली. या निधीतून दलित वस्त्यांमध्ये दर्जेदार कामे करण्याचे आवाहन जिल्हा परिषद समाज कल्याण समितीचे सभापती उमेश परहर यांनी केले आहे.

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्यावतीने ग्रामीण व शहरी भागातील अनुरूचित जाती व नवबौध्द वरत्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी जिल्हास्तरीय विविध योजना सामाजिक न्याय व विशेष आर्थिक सहाय्य योजना राबविण्यात येते. यात अनुरूचित जाती व नववौध्द घटकांच्या वस्तीचा विकारा करणे (पूर्वीचे नाव दलित वस्ती सुधार योजना). तसेच अनुरूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीमध्ये पाणी पुरवठयाची कामे, मलनि:स्सारण, वीज, गटर बांधणे, अंतर्गत रस्ते, पोहच रस्ते, समाज मंदिराचे बांधकाम या कामांचा समावेश आहे.

यासाठी पंचवार्षिक आराखडा तयार केला जातो. तसेच प्रत्येक वर्षी त्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास वस्तीतील विकास कामांना निधी वितरीत केला जातो. 2020-21 या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडुन जिल्हयातील 14 तालुक्यांना अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास कामांना सुमारे 93 कोटी 27 लाख 56 हजार रूपये इतक्या कामांना प्रशासकिय मंजुरी देण्यात आला आहे.

या योजनेच्या प्रस्तावांच्या मान्यतेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर पाठविण्यात आलेले आहेत.

अकोले तालुक्यासाठी 4 कोटी 50लाख 80 हजार रूपये, संगमनेरसाठी 9 कोटी 44 लाख 83 हजार रूपये, कोपरगावमध्ये 6 कोटी 28 लाख 50 हजार रूपये, राहात तालुक्यात 6 कोटी 68 लाख 31 हजार रूपये, श्रीरामपूरसाठी 6 कोटी 68 लाख 50 हजार रुपये, राहुरीमध्ये 6 कोटी 96 लाख रूपये, नेवाशासाठी 10 कोटी 76 लाख 50 हजार रूपये, शेवगावमध्ये 7 कोटी 73 लाख 51 हजार रूपये, पाथर्डी तालुक्यात 5 कोटी 29 लाख 10 हजार रूपये, जामखेडसाठी 3 कोटी 34 लाख रूपये, कर्जतमध्ये 6कोटी 2 लाख 60 हजार, श्रीगोंदा तालुका 6कोटी 43 लाख 83 हजार रूपये, पारनेरसाठी 5 कोटी 46 लाख 56 हजार रुपये आणि नगर तालुक्यासाठी 7 कोटी 64 लाख 52 हजार रूपये याप्रमाणे निधी मंजूर करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com