जिल्ह्यात आज 3225 रूग्ण घरी तर ‘एवढ्या’ करोना बाधितांची वाढ

जिल्ह्यात आज 3225 रूग्ण घरी तर ‘एवढ्या’ करोना बाधितांची वाढ
Covid 19DD

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध व संचारबंदी लागू केल्यानंतरही जिल्ह्यात करोना बाधितांच्या संख्येत घट दिसून आलेली नाही. शनिवारी नव्याने 3 हजार 780 बाधित रुग्ण वाढले असून एकाच दिवसात 55 मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या 23 हजार 302 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात शनिवारी 3 हजार 225 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनातून मुक्त होणार्‍यांची संख्या 1 लाख 30 हजार 938 वर पोहचली. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण 83.93 टक्के आहे. नगर शहर आणि तालुक्यात सर्वाधिक रुग्णवाढ आहे. शनिवारी नगर शहरात 970 तर तालुक्यात 376 नवे रुग्ण समोर आले आहेत. काल जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 999, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1 हजार 101 आणि अँटीजेन चाचणीत 1 हजार 680 रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 207, अकोले 64, जामखेड 107, कर्जत 61, कोपरगाव 47, नगर ग्रामीण 39, नेवासा 44, पारनेर 87, पाथर्डी 46, राहता 69, राहुरी 9, संगमनेर 92, शेवगाव 37, श्रीगोंदा 6, श्रीरामपूर 48, कँटोन्मेंट बोर्ड 26 आणि मिलिटरी हॉस्पिटल 8 आणि इतर जिल्हा 2 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 501, अकोले 11, जामखेड 3, कर्जत 13, कोपरगाव 11, नगर ग्रामीण 122, नेवासा 18, पारनेर 5, पाथर्डी 27, राहाता 97, राहुरी 23, संगमनेर 133, शेवगाव 21, श्रीगोंदा 10, श्रीरामपूर 67, कँटोन्मेंट बोर्ड 27 आणि इतर जिल्हा 11 आणि इतर राज्य 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत काल 1 हजार 680 जण बाधित आढळून आले. मनपा 262, अकोले 40, जामखेड 28, कर्जत 63, कोपरगाव 93, नगर ग्रामीण 215, नेवासा 184, पारनेर 93, पाथर्डी 35, राहाता 141, राहुरी 151, संगमनेर 72, शेवगाव 81 श्रीगोंदा 139, श्रीरामपूर 43, कॅन्टोन्मेंट बोर्ड 26 आणि इतर जिल्हा 14 अशा रुग्णांचा समावेश आहे. शुक्रवारी करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 हजार 721 होती. त्यात शनिवारी 55 ने वाढ झाल्याने आतापर्यंत करोना बळींची संख्या 1 हजार 776 झाली आहे.

शनिवारी नगर मनपा 970, नगर ग्रामीण 376, राहाता 307, संगमनेर 297, नेवासा 246, पारनेर 185, राहुरी 183, श्रीरामपूर 158, श्रीगोंदा 155, कोपरगाव 151, शेवगाव 139, जामखेड 138, कर्जत 137, अकोले 115 , पाथर्डी 108, भिंगार 79, अन्य जिल्हा 27, लष्कर 8 आणि अन्य राज्य 1 असे रूग्ण वाढले.

शहराबाहेर अंत्यविधी करावा- आ. जगताप

जिल्हाभरातून करोना उपचारासाठी रुग्ण नगर शहरात येतात. याठिकाणी उपचारादरम्यान संबंधित रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर नगर शहरातील स्मशानभूमीत अत्यंसंस्कार होतात. अंत्यविधीला गर्दी होत असून यामुळे नगर शहरात झपाट्याने करोनारुग्ण वाढत आहेत. स्मशानभूमी लगत नागरी वस्त्या असून याठिकाणी अंत्यसंस्कारामुळे धुराचे लोट निघत असून यामुळे नागरी भागात राहणार्‍या लोकांमध्ये आता भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका संशोधनात करोना हा आता हवेतून पसरत असल्याचे म्हटले जाते. यामुळे करोना मृतांचे त्यांच्या स्थानिक गावात अंत्यविधी करावेत, अथवा नगर शहराबाहेर करावेत, अशी मागणी आ. संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com