करोनाने ओलांडला दहा हजारांचा टप्पा !

आणखी 359 बाधित वाढले : मृतांच्या आकडेवारीत सहाने वाढ
करोना
करोना

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

मार्चपासून सुरू झालेल्या ‘करोना कहर’ने सोमवारी 10 हजारांचा टप्पा ओलांडला. काल नव्याने करोनाचे 359 बाधित समोर आले. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 10 हजार 82 झाली आहे. दरम्यान दिवसभरात 6 बाधितांचा मृत्यू झाला.

एकूण बळींची संख्या आता 112 झाली आहे. जिल्ह्यात करोनामुक्त होणार्‍यांची संख्या 6 हजार 647 झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 65.93 टक्के आहे. जिल्ह्यात सध्या 3 हजार 323 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये सोमवारी 41 रुग्णांचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात मनपा 21, नगर ग्रामीण 7, कँटोन्मेंट 4, पारनेर 5, जामखेड 1 आणि मिलिटरी हॉस्पीटल 3 अशा रुग्णांचा समावेश आहे. तर अँटीजेन चाचणीत 165 आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 153 रुग्ण बाधीत आढळले. अँटीजेन चाचणीत काल 165 जण बाधित आढळून आले.

यामध्ये, मनपा 1, संगमनेर 26, राहाता 15, पाथर्डी 29, नगर ग्रामीण 13, श्रीरामपुर 10, श्रीगोंदा 14, पारनेर 5, अकोले 3, राहुरी 9, कोपरगाव 8, जामखेड 10 आणि कर्जत 22 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 153 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 112, संगमनेर 3, पाथर्डी 6, नगर ग्रामीण 8, श्रीरामपूर 8, नेवासा 3, श्रीगोंदा 2, पारनेर 1, राहुरी 1 आणि कर्जत 6 अशा रुग्णांचा समावेश आहे.

6 हजार 646 रुग्णांची करोनावर मात

जिल्ह्यात काल 397 रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा 195, संगमनेर 29 राहाता 4, पाथर्डी 4, नगर ग्रामीण 11 श्रीरामपूर 1, कॅन्टोन्मेंट 3, नेवासा 11, श्रीगोंदा 20, पारनेर 36, अकोले 14, शेवगाव 29, कोपरगाव 26, जामखेड 6, कर्जत 6, मिलिटरी हॉस्पीटल 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. यामुळे करोना मुक्त झालेल्याची संख्या आता 6 हजार 647 झाली आहे.

सारांश

* बरे झालेले एकूण रुग्ण 6647

* उपचार सुरू असलेले रूग्ण 3323

* मृत्यू 112

* एकूण रूग्ण संख्या 10082

श्रीरामपूर तालुक्यात 20 बाधित

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात 74 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली असून त्यात 20 जण करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत तालुक्यातील करोनाबाधितांचा आकडा 429 वर जाऊन पोहोचला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोव्हिड सेंटरमध्ये 74 जणांची तपासणी करण्यात आली असून यात 20 जण करोना पॉझिटीव्ह तर 54 जण निगेटीव्ह आढळून आले आहेत.

संतलूक हॉस्पिटलमध्ये उपचार घेवून आजपर्यंत 263 जण बरे झाले असून काल 1 जणास बरे वाटत असल्यामुळे घरी सोडण्यात आले. तर 46 जणांवर संत लूकमध्ये उपचार सुरु आहेत. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड सेंटरमध्ये 39 जण उपचार घेत आहेत.

काल निघालेल्या पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये श्रीरामपूर तालुक्यातील वॉर्ड नं. दोन मध्ये -1, वॉर्ड नं. तीन -1, वॉर्ड नं. चार -2, डावखर मळा, गोंधवणी 1, वॉर्ड नं. सात- 4, उंबरगाव, मातापूर खंडाळा, दत्तनगर प्रत्येकी 1, व बेलापूर 4 जणांचा समावेश आहे.

श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत 2224 जणांचे स्त्राव घेण्यात आले असून 429 रुग्ण करोनाबाधित आढळले तर 1048 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 11 आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com