जिल्ह्यात आज 532 करोना रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तर वाढले 33 नवे करोना रुग्ण
जिल्ह्यात आज 532 करोना रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात आज एकूण 532 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणार्‍या रुग्णांची संख्या आता 8993 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही 75.99 टक्के इतकी आहे.

दरम्यान, काल (गुरुवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी 12 वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 33 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 2699 इतकी झाली आहे.

बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 11, कॅन्टोन्मेंट 04, पारनेर 14, शेवगाव 01, मिलीटरी हॉस्पिटल 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान आज एकूण 532 रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा 203, संगमनेर 43, राहाता 10, पाथर्डी 32, नगर ग्रा.21, श्रीरामपूर 19, कॅन्टोन्मेंट 24, नेवासा21, श्रीगोंदा 24, पारनेर 20, अकोले 7, राहुरी 8, शेवगाव25, कोपरगाव34, जामखेड 10, कर्जत 29, मिलिटरी हॉस्पीटल 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com