नगर जिल्ह्यात 647 पॉझिटिव्ह : सात जणांचा मृत्यू
सार्वमत

नगर जिल्ह्यात 647 पॉझिटिव्ह : सात जणांचा मृत्यू

करोनाबाधितांचा आकडा 11 हजार 273

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात नव्याने 647 करोना रुग्ण समोर आले असून करोना बळींच्या संख्येत 7 बळी वाढले आहेत. यामुळे करोनाबळींची एकूण संख्या 124 झाली आहे. दरम्यान जिल्ह्यात करोना बाधितांचा आकडा 11 हजार 273 झाला असून सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण 3 हजार 408 रुग्ण आहेत.

सर्वाधिक करोनाबाधित नगर शहरात 273 सापडले. दुसरीकडे जिल्ह्यात 7 हजार 741 रुग्णांनी करोनावर मात केली असून रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही 68.67 टक्के इतकी आहे.

बुधवारी जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 113, अँटीजेन चाचणीत 249 आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 285 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीत 40, पाथर्डी 04, नगर ग्रामीण 22, श्रीरामपुर 1, भिंगार छावणी मंडळ हद्दीत 10, नेवासा 13, पारनेर 12, राहुरी 1, शेवगाव 1, कोपरगाव 5, जामखेड 1, मिलिटरी हॉस्पीटल 1 आणि इतर जिल्हा 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत काल 249 जण बाधित आढळुन आले. यामध्ये, संगमनेर 31, राहाता 24, पाथर्डी 26, नगर ग्रामीण 3, श्रीरामपुर 10, कॅन्टोन्मेंट 3, नेवासा 6, श्रीगोंदा 15, पारनेर 10, अकोले 6, राहुरी 13, शेवगाव 33, कोपरगाव 15, जामखेड 22 आणि कर्जत 32 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 285 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 233, संगमनेर 8, राहाता 2, नगर ग्रामीण 12, श्रीरामपुर 3, कॅन्टोन्मेंट 4, नेवासा 2, पारनेर 2, अकोले 3, राहुरी 4, शेवगाव 2, जामखेड 7 आणि कर्जत 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

आणखी 478 करोनामुक्त

बुधवारी आणखी 478 रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा 185, संगमनेर 22, राहाता 14, पाथर्डी 30, नगर ग्रामीण 26, श्रीरामपूर 37, कॅन्टोन्मेंट 13, नेवासा 22, श्रीगोंदा 15, पारनेर 18, अकोले 6, राहुरी 4, शेवगाव 25, कोपरगाव 37, जामखेड 3, कर्जत 17 आणि मिलिटरी रूग्णालय 4 अशा रुग्णांचा समावेश आहे. यामुळे करोनावर मात केलेल्यांची संख्या आता 7 हजार 741 झाली आहे.

सारांश

* बरे झालेले एकूण रुग्ण 7 हजार 741

* उपचार सुरू असलेले रूग्ण 3 हजार 408

* मृत्यू 124

* एकूण रूग्ण संख्या 11 हजार 273

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com