जिल्ह्यातील सर्व न्यायालयाच्या कामकाज वेळेत बदल

सकाळी 11 ते दुपारी 2 वेळेत सुरू राहणार न्यायालये
जिल्ह्यातील सर्व न्यायालयाच्या कामकाज वेळेत बदल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाचा (corona) वाढता धोका लक्षात घेता जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व न्यायालयाच्या कामकाजामध्ये (court Work time Change) बदल करण्यात आला आहे. आज (सोमवार) पासून न्यायालयाची वेळ सकाळी 11 ते दुपारी 2 अशी असणार आहे. याबाबतचे आदेश प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी काढले आहेत.

राज्यात डेल्टा आणि डेल्टा प्लस (Delta Plus) या प्रकारच्या करोनाचे रूग्ण (Corona Patient) आढळले आहेत. या संसर्गाचा प्रादुर्भाव मोठा आहे. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंध लागू केले आहे. जिल्हा प्रशासनाने शनिवारी रात्री आदेश काढून जिल्ह्यात (District) निर्बंध लागू केले. करोनाच्या नवीन विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता जिल्ह्यातील न्यायालयाच्या कामकाजात बदल करण्यात आला आहे. सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत न्यायालयाचे कामकाज चालणार आहे. यावेळेत महत्वाची फौजदारी, दिवाणी प्रकरणांसह रिमांड प्रकरणांची सुनावणी चालणार आहे.

सुनावणीवेळी वकिल, पक्षकार, साक्षीदार, आरोपी गैरहजर असेल तर त्याबाबत विरूद्ध आदेश पारित करू नये. प्रत्येक शनिवारी न्यायालयाचे कामकाज (रिमांड वगळता) बंद राहणार आहे. न्यायालयाची वेळ 11 ते 2 अशी असल्याने त्यानंतर न्यायालयातील पार्किंगमध्ये कोणतेही वाहन आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. ज्या प्रकरणामध्ये दोन्ही बाजूचा युक्तीवाद झाला असेल त्या प्रकरणांचा निकाल जाहीर करण्यास हरकत नसल्याचे आदेशात म्हटले आहे. न्यायालयातील कॅन्टींग, बाररूम बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून 50 टक्के उपस्थितीवर कामकाज चालणार आहे. सदरचा आदेश आज (सोमवार) पासून पुढील आदेश येईपर्यंत लागू असणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com