जिल्ह्यात करोना लसीकरण साडेचार लाखांवर

जिल्ह्यात करोना लसीकरण साडेचार लाखांवर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जानेवारी महिन्यांपासून जिल्ह्यात करोना लसीकरण सुरू झाले असून आतापर्यंत करोना लसीकरण साडेचार लाखांवर पोहचले आहे. 3 लाख 82 हजार नागरिकांनी पहिला डोस तर 68 हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

दरम्यान तीन दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यासाठी 19 हजार लसींचा साठा गुरूवारी प्राप्त झाला. दीड दिवसात हा साठा संपणार आहे. जिल्ह्याने अद्याप लोकसंख्येच्या 10 टक्केही लसीकरण प्रमाण गाठलेले नाही. जिल्ह्यात आतापर्यंत लस घेतलेल्यांमध्ये आरोग्य विभाग (सरकारी आणि खासगी), महिला बालकल्याण विभाग 25 हजार 879, महसूल 1 हजार 275, पंचायत राज 3 हजार 362, पोलीस 3 हजार 298, गृह व शहरी कामकाज 1 हजार 632, रेल्वे सुरक्षा बलाच्या 272 जणांचा समावेश आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com