संगमनेर, पारनेरची करोना साखळी तुटेना; आज ‘इतके’ बाधित वाढले

संगमनेर, पारनेरची करोना साखळी तुटेना; आज ‘इतके’ बाधित वाढले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील (District) करोना बाधितांची (Covid 19 Positive) संख्या 500 च्या खाली येण्याचे नाव घेण्यास तयार नाही. विशेष करून संगमनेर (Sangamner) आणि पारनेरचा (Parner) करोनाचा आलेख वाढत आहे. याठिकाणी संसर्गाची साखळी तोडण्यात आरोग्य विभाग (Department of Health) आणि प्रशासनाला यश मिळत नसून शनिवारी पुन्हा संगमनेर (Sangamner) तालुक्यात करोनाने शतक केले आहे. तर पारनेर (Parner) तालुक्यात नव्याने 97 बाधित सापडलेले आहेत.

जिल्ह्यात करोनाची दुसरी लाट (Second wave of Corona in the District) अद्याप ओसरली नसल्याचे आरोग्य विभागाचे (Department of Health) म्हणणे आहे. जिल्ह्यात आजही दररोज 15 हजारांच्या जवळपास करोनाची चाचणी (Corona Test) सुरू आहे. चाचणीची संख्या मोठी असल्याने नव्याने बाधित असणारे सापडत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. विशेष करून संगमनेर (Sangamner) आणि पारनेरमध्ये (Parner) हे प्रमाण अधिक असून या दोन तालुक्याचा मुंबई (Mumbai), पुणे (Pune) आणि नाशिक (Nashik) असणारा दैनदिन संपर्कातून या ठिकाणी मोठ्या संख्याने रुग्ण वाढत असल्याचा प्रशासनाचे म्हणणे आहे.

शनिवारी नव्याने जिल्ह्यात 634 करोना बाधित (Covid 19 Positive) आढळून आले असून यात संगमनेर (Sangamner) 120, पारनेर (Parner) 97, अकोले (Akole) 57, पाथर्डी (Pathardi) 53, श्रीगोंदा (Shrigonda) 41, नगर ग्रामीण (Nagar Rural) 38, कर्जत (Karjat) 35, नेवासा (Newasa) 31, शेवगाव (Shevgav) 31, जामखेड (Jamkhed) 30, राहता (Rahata) 22, राहुरी (Rahuri) 22, मनपा (AMC) 20, अन्य जिल्हा 20, कोपरगाव (Kopargav) 9, भिंगार (Bhingar) 5, श्रीरामपूर (Shrirampur) 3 यांचा समावेश आहे.

नगर शहर नियंत्रणात

करोनाच्या दुसर्‍या लाटेत उन्हाळ्यात शहरातील स्थिती चिंताजनक बनली होती. शहरातील रुग्णांसोबत जिल्हाभरातून मोठ्या संख्याने रुग्ण नगर शहरात उपचारासाठी येत होते. मात्र, आरोग्य, मनपा प्रशासन आणि पोलीस विभागामुळे शहरातील करोनाची स्थिती नियंत्रणात आली असून गेल्या काही दिवसांपासून शहरात नव्याने करोना बाधित येणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com