corona
corona
सार्वमत

चिंताजनक ! करोना अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 2610

बुधवारी 470 नवे रुग्ण : मृतांच्या आकडेवारीत चारची वाढ

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात पहिल्यांदा करोनावर उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या 2 हजार 610 झाली आहे. यामुळे करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. यात नगर शहरातील करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

दरम्यान बुधवारी करोनाच्या रुग्ण संख्येत 470 ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 30, अँटीजेन चाचणीत 226 आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या 214 रुग्णांचा समावेश आहे. तसेच मृतांची आकडेवारीत 4 ने वाढ झाली असून जिल्ह्यात आतापर्यंत करोनाचे 88 बळी गेले आहेत. तर एकूण रुग्ण संख्या 7 हजार 278 झाली आहे.

बुधवारी सकाळी जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 16 रुग्ण बाधित आढळून आले. या बाधित रुग्णांमध्ये श्रीरामपूर 2, मनपा 4, भिंगार कॅन्टोन्मेंट 3, राहुरी 2, नगर ग्रामीण 2, कर्जत 1, श्रीगोंदा 1, नेवासा येथील 1 अशा रुग्णांचा समावेश होता. त्यानंतर, पुन्हा आणखी 14 जण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा हद्दीतील पाईप लाईन रोड 1 गौरी घुमट 1, सारसनगर 1, नगरशहर 1, दिल्लीगेट 1, सावेडी 1 असे 6 रुग्ण. नगर ग्रामीणमध्ये सारोळा कासार 1, भिंगार कॅन्टोन्मेंट 1, शेवगाव शहर टाकळी 1, कर्जत तालुक्यात राशीन 2, संगमनेर तालुक्यात निमोण 1 आणि श्रीरामपूरमध्ये 2 रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत काल 226 जण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा 17, संगमनेर 12, राहाता 12, पाथर्डी 25, नगर ग्रामीण 14, श्रीरामपुर 18, कॅन्टोन्मेंट 10, नेवासा 18, श्रीगोंदा 12, पारनेर 14, राहुरी 1, शेवगाव 25, कोपरगाव 30, जामखेड 3 आणि कर्जत 15 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 214 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 171, संगमनेर 17, राहाता 6, पाथर्डी 3, नगर ग्रामीण 3, श्रीरामपुर 1, नेवासा 4, श्रीगोंदा 3, पारनेर 1, अकोले 3 आणि कर्जत येथील 2 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल मधील उपलब्ध बेडसची संख्या आता एका क्लिकवर कळणार आहे. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी पोर्टल सुरू केले आहे. तेथे नागरिकांना सर्वसाधारण वार्ड, आय सीयु कक्षातील उपलब्ध बेड आणि ऑक्सिजन कक्षातील उपलब्ध बेडस यांची माहिती मिळणार आहे. त्यामुळे रुग्णांना कुठल्या हॉस्पीटलमध्ये बेडस उपलब्ध आहे. हे कळल्याने त्यांचा वेळ वाचणार आहे आणि रुग्णाला वेळेत उपचारासाठी दाखल करणे शक्य होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी काही दिवसांपूर्वी फेसबूक लाइव्ह कार्यक्रमात असे पोर्टल सुरू करणार असल्याची माहिती दिली होती.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com