नगर जिल्ह्यात आज नव्या 856 बाधितांची रुग्णसंख्येत भर

नगर जिल्ह्यात आज नव्या 856 बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात आज 581 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 24 हजार 731 इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 83.79 टक्के इतके झाले आहे. दरम्यान काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 856 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 4339 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 173, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 438 आणि अँटीजेन चाचणीत 245 रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 29, संगमनेर 11, राहता 18, पाथर्डी 04, नगर ग्रामीण 20, कँटोन्मेंट 03, नेवासा 23, पारनेर 01, अकोले 20, राहुरी 01, शेवगाव 05, कोपरगाव 12, जामखेड 18, मिलिटरी हॉस्पिटल 08 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 438 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 160, संगमनेर 30, राहाता 41, पाथर्डी 01, नगर ग्रामीण 36, श्रीरामपुर 64, कँटोन्मेंट 07, नेवासा 16, श्रीगोंदा 04, पारनेर 18, अकोले 05, राहुरी 41, शेवगाव 03, कोपरगांव 09, जामखेड 02 आणि कर्जत 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 245 जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा 42, संगमनेर 09, राहाता 48, नगर ग्रामीण 10, श्रीरामपूर 28, नेवासा 17, श्रीगोंदा 10, पारनेर 07, अकोले 20, राहुरी 03, कोपरगाव 09, जामखेड 16 आणि कर्जत 26 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज 581 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा 124, संगमनेर 68, राहाता 46, पाथर्डी 46, नगर ग्रामीण 08, श्रीरामपूर 38, कँटोन्मेंट 10, नेवासा 47, श्रीगोंदा 40, पारनेर 22, अकोले 06, राहुरी 24, शेवगाव 17, कोपरगाव 33, जामखेड 21, कर्जत 17, मिलिटरी हॉस्पिटल 09 आणि इतर जिल्हा 05 अशा रुग्णांचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com